आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अाज बंद अाणि चक्का जाम नाही; समन्वय समितीचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा अारक्षणाच्या मागणीकरिता गुरुवारी (दि. ९) ऑगस्ट क्रांतिदिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शांततामय मार्गाने ठिय्या अांदाेलन करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. कुठलाही बंद किंवा चक्का जाम अांदाेलन केले जाणार नसून नाशिक शहरात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना तर ग्रामीण भागात तहसील कार्यालयांसमाेर ठिय्या अांदाेलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार अाहे. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन करून निवेदन देऊन ठोक मोर्चात हुतात्मा झालेल्या 29 समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सांगता करण्यात येईल असे सकल मराठा सामाजाच्या समन्वय समितीने बुधवारी जाहीर केले.


तिढा न साेडविल्यास तीव्र अांदाेलन 
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी हाेणाऱ्या ग्रामसभेत मराठा आरक्षणाचा ठराव करून ताे मुख्यमंत्र्यांना पाठवावा, असे अावाहन जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांना समन्वय समितीकडून करण्यात अाले अाहे. दिलेल्या वेळेत आरक्षणाचा तिढा सोडवला नाही तर पुढील काळात आक्रमक चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी कोणाचेही काही ऐकून घेतले जाणार नाही. त्याच्या चांगल्या-वाईट परिणामास मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात अाला. 


अफवांवर विश्वास नकाेच 
नाशिक जिल्ह्यात कुठलाही चक्का जाम नाही, बंदही नाही, रास्ता राेकाे मराठा माेर्चाकडून केला जाणार नाही. त्यामुळे साेशल मीडियावरून सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले अाहे. ठिय्या अांदाेलनाचा निर्णय बैठकीत एकमताने ठरला असल्याने ताे जिल्हा गावपातळीवरदेखील राबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...