आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करू नका या 5 चुका, नाहीतर तुमच्या हातातुन जाईल नोकरी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनकवेळा लोकांना हे कळत नाही की, इंटरव्ह्यू किंवा बिझिनेस मीटींग चांगली पार पडली तरीदेखील हातातुन संधी का निसटुन जाते. बऱ्याचवेळा चांगले प्रजेंटेशन आणि आपल्या सब्जेक्टवर कमांड हे पुरेसे नसते. कळत नकळत इंटरव्ह्यू देणारा व्यक्ती असेकाहीतरी करून जातो ज्यामुळे हातात आलेली संधी निसटुन जाते, मग तुमची सगळी उत्तरे चांगली असली तर इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती तुमच्याबद्दल निगेटीव्ह विचार करते. त्यामुळेच फक्त प्रश्नांवरच फोकस न करता इतरही काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे.


सगळ्यात कडक इंटरव्ह्यूअरने दिल्या आहेत या टिप्स

- क्लोड लिटनर जगातील सगळ्यात कडक इंटरव्ह्यूअर माणले जातात. त्यांच्यासमोर तुमच्या आयडिया प्लॅन किंवा फक्त तुमचे मत मांडणे सोपे नाहीये.

- लिटनर लोकप्रिय शो 'द अप्रेन्टिस' लोकप्रिय झाले. त्यात 2.5 लाख पाउंड रक्कम जिंकायला आलेल्या स्पर्धकांचे इंटरव्ह्यू घेणे हे त्यांचे काम आहे.

- अंदाजे 2 कोटी रूपये पन्हाला लागलेले असतात त्यामुळे त्यांना छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते.

- लिटनरला जेव्हा विचारले की, ते छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष का देतात तेव्हा म्हणतात की, कॉम्पीटिशन कडक झाल्यावर छोट्या वरूनच विनर ठरवला जातो.

- लिटनरनेच या काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुम्ही त्या छोट्या चुका करणे टाळाल.

 

इंटरव्ह्यू किंवा मीटिंग रूममधून बाहेर निघणे हे इंटरव्ह्यू प्रमाणेच महत्त्वाचे आहे

- सर्वांना वाटते की, प्रश्न संपले म्हणजे इंटरव्ह्यूदेखील संपला. पण लिटनर म्हणतात की, इंटरव्ह्यू तेव्हाच संपतो जेव्हा आपण इंटरव्ह्यू रूमच्या बाहेर येतो.

- प्रश्न संपल्यापासून ते रूमच्या बाहेर येईपर्यंतचा वेळ विनर ठरवतो.

- प्रश्न संपताच वेगाने बाहेर जाणारे निगेटीव्ह छाप सोडतात.  अशा लोकांना आपण दिलेली उत्तरे बरोबर आहे वाटतात आणि या ओव्हरकॉन्फीडंसमुळेच हातुन संधी घालवतात.

- लिटनर अशा लोकांकडु प्रभावित होतात जे इंटरव्ह्यू संपल्यावरही संयम गाळगतात आणि कमी शब्दात सांगतात की, त्यांना ही नोकरी महत्त्वाची आहे.

 

एका शब्दात कधीच उत्तर देऊ नका.

- साधारणपणे प्रश्न छोटे असतात आणि त्यांची उत्तरे मोठी असतात. पण जर प्रश्न मोठा विचारला आणि उत्तर छोट दिले तर निगेटीव्ह छाप पडते.

- लिटनर सांगतात की, हो किंवा नाही याप्रकारची उत्तरे नका देउ, यामुळे तुमची संधी जाण्याची शक्यता असते. जरी तुमचे एका शब्दाचे उत्तर बरोबर असेल तरीदेखील तुम्ही फक्त एका शब्दात उत्तर नका देऊ. इंटरव्ह्यूअर तुमच्या उत्तरामध्ये प्रश्न शोध असतो. 

- तुमच्या उत्तरामुळे त्याला पुढील प्रश्न विचारायला संधीच नाही मिळणाल त्यामुळे इंटरव्ह्यू तिथेच थांबून जाईल.

 

इंटरव्ह्यूअरसोबत जास्ती मैत्री नका करू

- एक चांगला इंटरव्ह्यूअर वातावरण चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो, ती त्याची खासीयत असते तुमची नाही.

- इंटरव्ह्यूअरने बनवलेल्या मैत्रीपूर्ण वातावरणात सहभागी व्हा पण जास्ती नका होउ, अशाने खराब छाप पडते.

- इंटव्ह्यूच्या वेळेस आपली मर्यादा ओळखा आणि त्यापद्धतीनेच वागा.


हलगर्जीपणा चांगला नाही

- इंटरव्ह्यू दरम्यान हलगर्जीपणा चांगला नाही, यामुळे समस्या निर्माण होउ शकतात.

- इंटरव्ह्यूला लेट जाणे, मह्त्तावची डॉक्यूमेंट सोबत न ठेवणे यामुळे खराब छाप पडते.

- ज्या कंपनीत आपण नोकरी करायला जात आहोत त्या कंपनी बद्दल माहिती नसणे सर्वात घातक आहे.

 

इतर लोकांसोबत स्वत:ची तुलना

- स्वत:ला बेस्ट ठरवण्यासाठी इतरांसोबत केलेली तुलना तुम्हाला चांगली वाटु शकते पण काहीवेळेस ती इंटरव्ह्यूअरला आवडेलच असे नाही.

- यामुळे जरी तुम्ही नोकरी मिळवली पण काम करताना तुमच्या कामवरून तुमची पात्रता लगेच दिसून येते. त्यामुळे ओव्हर कॉन्फीडंसमध्ये जाऊ नका. सजे आहात तसेच राहा.

 

 

या काही टिप्स लिटनर यांनी दिल्या आहेत. यांना फॉलो केल्यास तुमचा इटरव्ह्यू चांगला जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...