आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फेमस टीव्ही कपलने लपवली होती प्रेग्नेंसीची बातमी, घरी आला नवा पाहुणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः 'सिलसिला बदलते रिश्तों का' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती देव शर्माविषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अदितीने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. नऊ महिने अदितीने तिच्या प्रेग्नेंसीविषयी कुणालाही कळू दिले नव्हते. अदितीने आपल्या मुलाचे नाव सरताज ठेवले आहे. अदितीचे लग्न बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता सरवार आहुजासोबत झाले आहे.

विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात अदिती आणि सरवार यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आणि याच महिन्यात त्यांच्या बाळाचे आगमन झाले आहे त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. एका मुलाखतीत अदितीने सांगितले की, घरी बाळाला सर्वजण कृष्णा (टोपणनाव) म्हणतात. कारण त्याच्याकडे बघून एक वेगळेच समाधान लाभते. अद्याप दोघांनीही आपल्या बाळाचा फोटो रिव्हिल केलेला नाहीये.

काही दिवसांपूर्वी अदितीची काही छायाचित्रे आली होती, ज्यात तिचा नवरा आणि अभिनेता सरवार आहुजा तिला लपवताना दिसला होता. अदितीने तिच्या गरोदरपणाबद्दल कधीही कोणतीही माहिती उघड होऊ दिली नाही, म्हणून कुणालाही कळाले नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणींनी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला होता, तो गुपचूप साजरा केला.