आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः एक्ट्रेस सारा खाननंतर आता टीव्ही अभिनेता शक्ती अरोरा बाथरुम सेल्फीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच सारा खानचा बाथरुम व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन बराच वादंग निर्माण झाला होता. न्यूड व्हिडिओ शेअर केल्याने सोशल मीडिया यूजर्सनी साराला ट्रोल केले होते. त्यानंतर तिने व्हिडिओ डिलीट केला होता. साराने स्पष्टीकरण देताना म्हटले होते, की तो व्हिडिओ तिच्या बहिणीकडून चुकून पोस्ट झाला होता. आता 'सिलसिला बदलते रिश्तों का' फेम शक्ती अरोराचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये तो बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसतोय.
सध्या शक्ती सुटी एन्जॉय करत आहे. शक्ती 'सिलसिला बदलते रिश्तों का' या मालिकेत कुणाल हे पात्र साकारत आहे. त्याच्यासोबत दृष्टी धामी आणि आदिती शर्मा मेन लीडमध्ये आहेत. या मालिकेची कहाणी एक्सटर्नल अफेअर्सवर आधारित आहे. मालिकेचा TRP हळूहळू वाढत चालला आहे. पहिल्यांदाच दृष्टी आणि शक्ती एका मालिकेत झळकत असून दोघांची केमिस्ट्री पसंत केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.