आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत : सोने-चांदी-हिरे वापरून बनवलेल्या दस्तएेवजांवर केली चक्क दुकानाची रजिस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - गुजरातच्या सुरतमध्ये गत मंगळवारी सोने-चांदीची कागदपत्रे बनवून  दुकानाची रजिस्ट्री करण्यात अाली. हे दस्तएेवज रीटा राजेंद्रकुमार चांडक यांच्या नावाने अाहेत. या कागदपत्रांची पाने चांदीची असून, त्यासाठी १० ग्रॅम सोने, २.६ किलो चांदी व २०० अमेरिकन डायमंड वापरलेत. या कामासाठी ८ लाख रुपये खर्च अाला. विशेष म्हणजे, दुकानाची किंमतही ८ लाख रुपये अाहे. अधिवक्ते अरुण लाहोटी यांनी हे दस्तएेवज तयार करवून घेतले असून, त्याची नाेंद इंडिया बुकमध्ये झाली अाहे. ही अातापर्यंतची सर्वात महाग रजिस्ट्री असून, यास गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळेल, असा दावाही लाहाेटींनी केला अाहे. दरम्यान, सुरतमध्ये अातापर्यंत गुजराती-इंंग्रजी व संस्कृतमध्ये मालमत्तेची नाेंद हाेत हाेती; परंतु या वेळी सोने-चांदीच्या दस्तएेवजांची हिंदीत नाेंद झाली अाहे.

 

भारतीय सोने-चांदीची कला जगभरात प्रसिद्ध अाहे. देशाच्या या कलेला जागतिक स्तरावर अाेळख मिळणे व प्राेत्साहन देण्यासाठी महागडे धातू वापरून ही कागदपत्रे बनवली, असे लाहाेटींनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...