आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रधान सचिवांनी सकाळी फोनवरून सांगितले; सायंकाळी अधिसूचना आली, मग मी पहाटे चार वाजताच गेटवर बाबासाहेबांचे नाव लिहिले’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्रीतून विद्यापीठाची स्टेशनरी, शिक्केही बदलून घेतले
  • इंग्लंडच्या उच्चायुक्तांचा अभिनंदनाचा फोन

रवींद्र डोंगरे 

औरंगाबाद - बरोबर २५ वर्षांपूर्वी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या निर्णयाच्या काही दिवस आधीच तेव्हाचे कुलगुरू डाॅ. बी. व्ही. घुगे यांना या निर्णयाची माहिती झाली होती. त्यासंदर्भातल्या आठवणी त्यांच्याच शब्दांत....

‘मला १३ जानेवारी १९९४ रोजी सकाळीच प्रधान सचिवांचा फोन आला. विद्यापीठ आणि महाविद्यालय परिसरातील वातावरण कसे आहे? याची माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली. याच्या दोन दिवस आधी गुप्तचर विभागाचे सत्यपाल सिंह माझ्याकडून माहिती घेऊन गेले होते. तुम्ही चिंता करू नका. कारण या निर्णयाचे सर्वजण आनंदाने स्वागत करतील, अशी मी त्यांना ग्वाही दिली होती. १३ तारखेला लखनपाल यांनी सकाळीच फोन करून नामांतराची गोड बातमी दिली. त्याच दिवशी रात्री १० वाजता आम्ही विद्यापीठ गेटवरील जुने  नाव खोडून नवीन नाव पेंट करण्याच्या कामाला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव लिहिण्याचे काम पहाटे ४ वाजेपर्यंत चालले. माझ्यासोबतच डॉ. वि. ल. धारूरकर यांच्यासह काही प्राध्यापक तिथे तळ ठोकून होते. नवीन नाव रंगवण्याच्या कामात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. गोविंद गारे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्याच आदेशाने अग्निशमन विभागाच्या उंच शिड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून रात्रभर विद्यापीठ गेट परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.रात्रीतून विद्यापीठाची स्टेशनरी, शिक्केही बदलून घेतले

शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर रातोरात स्टेशनरीमधील जुने नाव खोडून नवीन नाव प्रिंट करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये हे काम अविरतपणे सुरू होते. नवी स्टेशनरी सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांमध्ये पोहोचवण्यासाठी अनेक वाहनांचा वापर करण्यात आला. विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची आदल्या दिवशी बैठक घेऊन १४ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. 

इंग्लंडच्या उच्चायुक्तांचा अभिनंदनाचा फोन

१४ जानेवारीला भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त डॉ. एल. एम. सिंगवी यांनी मला फोन करून आनंद व्यक्त केला. सन १९५० पूर्वीच त्यांचा बाबासाहेबांशी निकटचा संबंध आला होता. जेव्हा बाबासाहेबांची १०३ वी जयंती होती. त्या वेळी विद्यापीठाने घेतलेल्या कार्यक्रमाला त्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. नामांतराची बातमी प्रसिद्धी माध्यमांनी सर्वदूर पोहोचवल्यामुळे देश-विदेशातून बहुसंख्य उच्चपदस्थ अधिकारी, संस्थांचे पदाधिकारी यांनीही दूरध्वनीद्वारे आणि तार करून विद्यापीठाचे अभिनंदन केलेे. हा कार्यक्रम महिनाभर चालला होता

बातम्या आणखी आहेत...