आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता मनोज बाजपेयींच्या कारकिर्दीचे रौप्यमहोत्सवी वर्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोज बाजपेयींना अभिनय करता करता आता २५ वर्षे झाली. त्यांना प्रथमच 'द फॅमिली मॅन' नावाच्या वेब सिरीजमध्ये कुटुंबाची जबाबदारी वाहणाऱ्या व्यक्तीची भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना बहुतेक वेळा चरित्र भूमिका मिळालेल्या आहेत. राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या' चित्रपटात भिखू म्हात्रेची त्यांची भूमिका गाजली. त्यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये अभिनय केला होता. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका चित्रपट संस्थेने अनुराग कश्यप यांच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'ला महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून घोषित केले. अमेरिकन संस्थेला बहुतेक भारतातील जातिप्रथा आणि धर्मावरून होणाऱ्या जातिभेदाची कल्पना नसावी. त्यांच्या चित्रपटातील काल्पनिक वासेपूर मोहल्ल्यातील सारे रहिवासी इस्लामचे अनुयायी आहेत आणि सारे गुन्हेगारही आहेत. त्यांच्या 'ब्लॅक फ्रायडे' चित्रपटातही इस्लाम विरोधाची झलक दिसते. सध्या काही निर्माते धार्मिक सद्भावनेचा संदेश देणारे चित्रपट बनवतात, पण याला काही अपवादही आहेत. ऋषी कपूर अकरा महिन्यांनंतर अमेरिकेत उपचार घेऊन निरोगी होऊन आलेला आहे. त्यांनी 'मुल्क'च्या निर्मात्यांना तशाच प्रकारचे चित्रपट बनवण्याची शिफारस केली आहे. फूट पाडून राज्य करणे हा इंग्रजांचा शोध नाही, त्यांनी फक्त दुखणाऱ्या नसेवर बोट ठेवले. आपण तर नेहमीच वेगळे राहूनही एकत्र असल्याचा आभास निर्माण करून देत आहोत. उच्च जीवनमूल्यांचा ऱ्हास होण्याची अनेक कारणे असू शकतात. स्वातंत्र्यानंतर छोट्या शहरांमधून रोजीरोटीच्या शोधात पलायन सुरू झाल्याने एकत्रित कुटुंबांचे विघटन झाले. यात भांडणे होत, पण कुटुंबे एकत्र राहत असत. मनोज बाजपेयी यांचा जन्म बिहारच्या चंपारणमध्ये झाला, जेथे गांधींजींनी आपला पहिला सत्याग्रह केला होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्याचा तीन वेळा प्रयत्न त्यांनी केला, पण अयशस्वी झाले. मुंबईत बराच काळ संघर्ष केला. नंतर सरळ व्यावसायिक अभिनयात थेट बाजी मारली आणि विविध प्रकारच्या भूमिका केल्या. 'अलिगड' नावाच्या चित्रपटात त्यांनी एक साहसी भूमिकाही केली आहे. मनोज वाजपेयी हे मोतीलाल आणि बलराज साहनीच्या परंपरेतील अभिनेते आहेत. ही परंपरा ओम पुरी व नसिरुद्दीन शहापासून सुरू होऊन मनोज वाजपेयींपर्यंत पोहोचली आहे. काटकसरी स्वभाव असल्याने अनेक वर्षांपासून या उद्योगात टिकून आहेत. फालतू खर्च करत नाहीत. आर्थिक मंदीची चर्चा चालू असण्याच्या काळात बचतीची जीवनशैली हाच आधार आहे. चित्रपट उद्योगातही आता पैसे वाचवण्याचे तंत्र आत्मसात करण्यात आले आहे. कलाकार व्यावसायिक दृष्टिकोन बाळगत आहेत. सेटवर पूर्ण तयारीने वेळेवर येतात. चित्रपट वेगाने निर्माण होत आहेत. केवळ चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणे आणि त्यातूनच उत्पन्न मिळवणे हा एकच स्रोत राहिलेला नाही. चित्रपट प्रदर्शनाचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. मनोज बाजपेयीच्या यशावरून हेही सिद्ध होते की, अभिनयाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नाही तरी प्रतिभा आपला मार्ग शोधून काढतेच. जीवनाच्या पाठशाळेत सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी राजकुमाराला सर्व प्रकारच्या विद्यांचे शिक्षण दिले जात असे. अभिनेता हा एकाच जीवनात कितीतरी अनुभवातून जात असतो, अनेक प्रकारच्या भूमिका करतो. भूमिकांचा थोडाबहुत प्रभाव त्यांच्या विचारशैलीवरही पडतो.


जयप्रकाश चौकसे
चित्रपट समीक्षक
jpchoukse@dbcor
p.in

बातम्या आणखी आहेत...