आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Silver Whisper's 2020 World Cruise Will Last 140 Days To Visit All Seven Continents

ही क्रूझ फिरवेल 140 दिवसांत 32 देश; या रोमांचक वर्ल्ड टूरसाठी तुम्हीही करा बुकींग...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला वर्ल्ड टूर करायची असल्यास तुमच्यासाठी एक खास संधी आहे. जगात सर्वांच्या परीचयाची क्रूझ कंपनी 'सिल्व्हर सी' एक ऑफर देत आहे. या ऑफरमुळे तुम्ही 140 दिवस क्रूझच्या प्रवासादरम्यान तुम्ही 32 देश आणि 62 डेस्टिनेशन पाहू शकता. हा प्रवास 6 जानेवारी 2020 पासुन सुरू होणार असुन सिल्व्हर सी या वेबसाइटवर या टूरची बुकिंग सुरू झाली आहे.

 

कधी सुरू होईल ही टूर

ही रोमांचक टूर 6 जानेवारीला फ्लोरिडातील फोर्ट लॉडरडेल इथून सुरू होणार आहे. त्यानंतर 140 दिवसांनी म्हणजेच 20 मेला अॅमस्टरडॅम येथे संपणार आहे.

 

टूरदरम्यान  किती शहरे फिरु शकता

या टूरदरम्यान तुम्ही 7 खंडांतील 32 देशांत फिरणार आहात. प्रवासात 62 बदंरांवर या क्रूझचा थांबा असणार आहे. ही क्रूझ सॅन जुआन, पोर्टो रीको, रियो डी जेनेरो, ब्युनस आयर्स, अर्जेंटीना, कोस्ट ऑफ चिली, सिडनी, मुंबई, सिंगापूर, थायलंड, बार्सिलोना, लिस्बन, डबलीन आदी या बंदरांवर ही क्रूझ थांबणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा- किती असेल या वर्ल्ड टूरचे भाडे

बातम्या आणखी आहेत...