आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदी ५० हजार रुपयांवर, सहा वर्षांतील सर्वाधिक किंमत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफा बाजारात साेने-चांदीच्या किमतीत तेजीचा कल आहे. स्थानिक बाजारात मंगळवारी चांदीची किंमत एका दिवसात २,०७० रुपयांनी वाढली. दिल्ली आणि मुंबईच्या सराफा बाजारात एक किलाे चांदीची किंमत ५०,१२५ रुपयांवर गेली. चांदी याअगाेदर सहा वर्षांपूर्वी या पातळीवर हाेती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रती आैंस १९.४ डाॅलरवर गेला. ही गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक किंमत आहे. सराफा बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका- चीन व्यापार युद्ध, ब्रेक्झिटची अनिश्चितता या आधारावर जागतिक आर्थिक घडामाेडीमध्ये आलेली नरमाईची चिंता यामुळे व्यापाऱ्यांकडून चांदीला मागणी आहे.