Tennis / सिमाेना हालेप विम्बल्डन चॅम्पियन; सेरेनाचा केला पराभव

माजी चॅम्पियन सेरेनाला अवघ्या 53 मिनिटांत केले पराभूत 

वृत्तसंस्था

Jul 14,2019 09:59:00 AM IST

लंडन - राेमानियाची अव्वल टेनिसपटू सिमाेना हालेप ही विम्बल्डन स्पर्धेत नवीन चॅम्पियन खेळाडू ठरली. तिने शनिवारी महिला एकेरीचा किताब पटकावला.सातव्या मानांकित हालेपने फायनलमध्ये माजी नंबर वन सेरेनाचा पराभव केला. तिने ६-२, ६-२ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह तिने करिअरमध्ये प्रथमच विम्बल्डनची ट्राॅफी पटकावली. तिने सात वेळच्या माजी चॅम्पियन सेरेनाला अवघ्या ५३ मिनिटांत पराभूत केले. याच खेळीच्या बळावर हालेपने राेमानियाच्या टेनिसपटूने विक्रमाची नाेंद केली. विम्बल्डनचा किताब जिंकणारी ती राेमानियाची पहिली महिला टेनिसपटू ठरली. तिने आपल्या करिअरमध्ये दुसरा ग्रँडस्लॅम किताब पटकावला आहे.


सेरेनाचा मार्गारेटच्या विक्रमाशी बराेबरी साधण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मार्गारेटच्या नावे २४ ग्रँडस्लॅम किताबाची नाेंद आहे. आता विम्बल्डनच्या किताबाने सेरेनाला याची बराेबरी साधता आली असती. तिने आतापर्यंत २३ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
आज फेडरर आणि नाेवाक याेकाेविक यांच्या पुरुष एकेरीची फायनल रंगणार आहे. स्वीसकिंग फेडररने उपांत्य सामन्यात माजी नंबर वन नदालचा पराभव केला.

X
COMMENT