आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चित्रपटांमुळे कमी झाली रणवीर सिंहच्या 'सिम्बा' ची कमाई, 16 दिवसात फिल्मने कमवले 215 कोटी, कठीण होईल 250 कोटींचा आकडा पार करणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रणवीर सिंहच्या 'सिम्बा' ने रिलीजच्या 2 आठवड्यापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण तीसऱ्या आठवड्यात मात्र फिल्मच्या कमाईची गती काहीशी मंदावली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार, फिल्मने तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 2.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. फिल्मने 16 दिवसात 215. 03 कोटी रुपयांची कमाई केली. फिल्मच्या कमाईच्या गतीवर दोन चित्रपटांमुळे परिणाम झाला आहे. 'उरी' आणि 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'. 'उरी' ने दोन दिवसांतच 21 कोटी आणि 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' ने 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

 

विभागला गेला ऑडियंस...
- तरण आदर्शचे म्हणणे आहे की, 'उरी' आणि 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' मुळे ऑडियंस विभागला गेला आहे. या दोन्ही चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. 

- तरणचे म्हणणे आहे की, या दोन चित्रपटांना पाहून असे वाटते की, 'सिम्बा' ला भारतामध्ये 250 कोटींचा आकडा पार करणे सोपे नाही. 

 

रोहितची कमाई... 
रिपोर्ट्सनुसार, 'सिम्बा' रोहित शेट्टीची सर्वात जास्त कमाई करणारी फिल्म ठरली आहे. यापूर्वी 2013 मध्ये फिल्म 'चेन्नई एक्सप्रेस' ने 207 कोटींची कमाई केली होती. 2017 मध्ये आलेली फिल्म 'गोलमाल अगेन' ने 205 कोटींची कमाई केली होती. रोहितने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, अजय देवगनने फिल्म पाहिल्यानंतर म्हणाला होता की, 'सिम्बा' उत्तम चित्रपट आहे, जो त्याच्यासाठी सर्वात मोठा अवॉर्ड आहे. 'सिम्बा' चे यश पाहुन प्रोड्यूसरची 'सिम्बा 2' बनवण्याची इच्छा आहे. लवकरच त्याची ऑफिशियल अनाउंसमेंट केली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...