आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Simmba Box Office Collection Day1 Ranveer Singh Sara Ali Movie Simba 1st Day Box Office Collection

Simmba Box Office Collection: उद्या रिलीज होणार रणवीर-साराचा सिंबा, एवढे असेल फर्स्ट डे कलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - रोहित शेट्टी कॅम्पचा मोस्ट अवेटेड सिंबा चित्रपट काही तासांत रिलीज होत आहे.

 

काही दिवसांपूर्वी शाहरूख खानचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला झिरो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यामुळे हा चित्रपट साफ आपटला होता. त्यामुळेच आता सिंबाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण सिंबा हा खास रोहित शेट्टी कॅम्पचा टोटल एंटरटेनर मसाला चित्रपट आहे. त्यात रणवीरची खास भूमिका आणि अजय देवगणच्या सिंघमचे बॅकग्राऊंड यामुळे चित्रपटाला तगडी ओपनिंग मिळणार असल्याची शक्यता एक्सपर्टसने वर्तवली आहे. 


चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर त्या चित्रपटाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे शुक्रवारी सिंबाला कसा रिस्पॉन्स मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. पण फिल्म क्रिटिक्स आणि इतर एक्सपर्टसच्या मते सिंबाला पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी तब्बल 18 ते 20 कोटींचे तगडे ओपनिंग मिळू शकते. यासाठीची कारणेही तशीच देण्यात आली आहे. 


यामुळे मिळू शकते सिंबाला तगडे ओपनिंग..
>> झिरोकडून निराशा पदरी आल्याने ऐन ख्रिसमसच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये प्रेक्षकांना चांगला पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे सिंबाला चांगले बुकींग मिळत असल्याचे दिसते आहे. 
>> सिंबा हा चित्रपट रोहित शेट्टी यांचा हातखंडा असलेला फुल टू मसाला एंटरटेनर स्टाइलजचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची गर्दी पहिल्या दिवशी नक्की होणार या काही शंका नाही. 
>> चित्रपटाची स्टार व्हॅल्यू मोठी आहे. एकतर चित्रपटाला सिंघमचे बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे अजय देवगणची लहानशी असली तरी महत्त्वाची भूमिका चित्रपटात आहे. त्यात रणवीर सिंगसाठी क्रेझी असलेले फॅन्स आहेत. शिवाय केदारनाथ द्वारे पदार्पण केलेल्या साराचाही मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यामुळे यासर्वांचा याला फायदा होणार आहे. 
>> चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड पसंती मिळाली आहे. आँख मारे.. गाण्याने तर सर्वत्र धूम केली आहे. हा रिस्पॉन्स पाहता 20 कोटींच्या फर्स्ट डे कलेक्शनचे प्रेडिक्शन सिंबासाठी फारसे अवघड नसेल. 

>> वीकेंड आणि न्यू इअर फिव्हरचा फायदा सिंबाला नक्की मिळणार आहे. फेस्टीव्ह मूड असल्याने थिएटर्सला गर्दी होणार यात शंका नाही. 

>> चित्रपट देशभरात एकाचवेळी 3000 स्क्रीनवर रिलीज होत आहे. त्यात रोहित शेट्टींचे चित्रपट नेहमीच बंपर ओपनिंग करणारे राहिलेले आहेत. मग ते गोलमाल सिरीज असो, सिंघम असो की चेन्नई एक्सप्रेस. 

 

 

बातम्या आणखी आहेत...