आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Simmba Movie Review: दुबईत प्रदर्शित झाला सिंबा, लोकांनी दिली अशी प्रतिक्रिया; जाणून घ्या रिव्ह्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंह आणि सारा अली खान यांचा बहुचर्चित सिंबा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित होत आहे. पण त्याआधीच हा चित्रपट दुबईत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यूदेखील समोर आले आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असून रणवीर सिंहच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

 

एक लाचखोर पोलिस इंस्पेक्टर एका घटनेनंतर पू्र्णपणे बदलतो आणि त्याच्यातील सिंबा जागा होतो...आणि त्यानंतर चित्रपट वेगळेच वळण घेतो. दुबईतील लोकांनी चित्रपट पाहिल्यानंतर आनंदी होऊन सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत चित्रपटला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. एका युझरने सिंबा चित्रपट पाहत असताना मध्यांतरामध्ये रणवीर सिंहने उत्साही इंस्पेक्टरचा रोल उत्तम प्रकारे साकारले असल्याचे सोशल मीडियावर लिहीले आहे. मसालेदार आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मीती केली आहे. या चित्रपटाकडून सुद्धा अशाप्रकारची अपेक्षा करण्यात आली आहे. तर दुबईमध्ये त्याच अपेक्षांवर चित्रपट उतरला आहे. आता शुक्रवारी देभरातील 3000 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


दिसली सिंघमची झलक 
सिंबा चित्रपटात सिंघमची झलकदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या चित्रपटात सिंघमचा फ्लॅशबॅक दाखवण्यात आला आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही अॅक्शन आणि कॉमेडीचा भरपूर मसाला आहे. लग्नानंतर रणवीरचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

 

सारा अली खानचा दुसरा चित्रपट

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी साराच्या बॉलिवूड कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट आहे. याआधी याच महिन्यात सारा अली खानचा केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये तिच्या अभिनयाचे चांगलचे कौतु करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...