आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Simmba Special Screening : Salim Khan, Salma Khan And Helen Spotted,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सिम्बा'च्या स्क्रीनिंगमध्ये दोन्ही पत्नींसोबत पोहोचले सलमान खानचे वडील, एकत्र दिसल्या दोन जुन्या मैत्रिणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. रणवीर सिंहचा 'सिम्बा' चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या यशाने आनंदी होऊन डायरेक्टर रोहित शेट्टीने बुधवारी रात्री स्पेशल स्क्रीनिंग ठेवली. ही स्क्रीनिंग विशेषतः इंडस्ट्रीच्या जेष्ठ सेलेब्ससाठी होती. चित्रपट पाहण्यासाठी सलमान खानचे वडील सलीम खान दोन्ही पत्नी सलमान खान आणि हेलनसोबत पोहोचले. रोहितने सलीम खानचे स्वागत केले. जुन्या मैत्रिणी वहीदा रहमान आणि आशा पारेखही एकत्र स्पॉट झाल्या. यासोबतच इतर सेलेब्सही येथे पोहोचले. 


'सिम्बा'ने 6 दिवसात कमावले 139 कोटी रुपये 
-  रणवीर सिंह आणि सारा खानच्या 'सिम्बा'ने 6 दिवसात 139 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार चित्रपटाने मंगळवारपर्यंत 124.54 कोटी रुपये कमावले होते आणि बुधवारची कमाई मिळून चित्रपटाने 139 कोटी कमाले. अशाप्रकारे रोहित शेट्टीचा सतत आठव्या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 

 

करु शकते 150 कोटींची कमाई 
- या वेगाने चित्रपट कमाई करत आहे, त्यावरुन चित्रपट 150 कोटींचा आकडा सात दिवसात पार करु शकतो. 
- तरण आदर्शनुसार 'सिम्बा'ने शुक्रवारी 20.72 कोटी, शनिवारी 23.33 कोटी, रविवारी 31.06 कोटी, सोमवारी 21.24 कोटी आणि मंगळवारी 28.19 कोटी आणि बुधवारी 14.49 कोटींची कमाई केली आहे. 

 

इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी कमाई 
चित्रपटाने फक्त भारतीय मार्केटमध्ये नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्येही चांगली कमाई केली आहे. तरण आदर्शनुसार चित्रपटाने इंटरनॅशनल मार्केटमध्ये मंगळवारपर्यंत जवळपास 50 कोटींची कमाई केली आहे.