आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या IPS अधिकाऱ्याची बॉडी एखाद्या बॉलीवूड अभिनेत्यापेक्षा कमी नाही, बादलीत वाळू भरून करतात एक्सरसाइज; फिट राहण्यासाठी अशाप्रकारे फॉलो करतात डायट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भोपाळ : चित्रपटसृष्टीत आपली भूमिका वटविण्यासाठी अनेक कलाकार बॉडी बनवतात. पण या IPS अधिकाऱ्यांची बॉडी देखील एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाही. 1992 च्या बॅचचे IPS दिनेश सागर त्यांच्या फिटनेसमुळे पोलिस विभागात चर्चेचा विषय ठरत आहेत. फक्त एका दंडुकाच्या मदतीने व्यायाम करत एक पोलिस कर्मचारी चांगली फिटनेस ठेवू शकतो हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी फेसबुकवर देखील फिटनेस टीप्स शेअर केल्या आहेत. 


- दिनेश सागर मध्यप्रदेश पोलिसात टेक्निकल विभागाचे एडीजी पदावर कार्यरत आहेत. 

- ADG दिनेश सागर यांनी फेसबुकवर पोस्ट करत एक्सरसाइज करण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले की, जे पोलिस कर्मचारी कामानिमित्त जिममध्ये नाही जाऊ शकत किंवा व्यायाम नाही करू शकत. असे कर्मचारी त्यांनी मिळालेल्या दंडुकाच्या मदतीने आपले शरीर फीट ठेवू शकतात. 

 

- हा व्यायाम वैज्ञानिकरित्या शरीराव परिणाम करते. कमी वजनाने रिपीटेशन केल्यानंतर शरीरातील फॅट कमी होईल आणि हळूहळू मसल्स तयार होतील. पण यासाठी नियमाने पोषक डायट करावे लागेल. 

 

- या एक्सरसाइजला वेगवेगळ्या दिवसांमध्ये विभागू शकत असल्याचे दिनेश यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फक्त बॉडी बनवणे म्हणजे परफेक्ट फिटनेस नसून तर फीट राहणे परफेक्ट फिटनेस आहे.


अशाप्रकारे आहे त्यांचा डायट

- दिनेश त्यांच्या दररोजच्या व्यायामबरोबरच योग्य तो डायट फॉलो करतात. आपल्या आहारामध्ये दूध, दही, पनीर, हरभऱ्याची पोली, दाळ आणि ग्रीन सलाड अशा नॅचरल पदार्थांचे सेवन करतात. 

 

- 80 टक्के प्रोटीन युक्त डायट आणि 20 टक्के व्यायामाच्या मदतीने योग्य फिटनेस प्राप्त करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यायामानंतर हळदीचे दूध प्यावे आणि सकाळी उठल्यावर फळे, पनीर, बदाम आणि मोड आलेले कडधान्य खावे. 


पोलिसांत LLB चा योग्य वापर करण्यासाठी बनले IPS
दिनेश सागर यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर येथे झाला. वडील सैन्यात होते आणि आई हाउस वाइफ होती. तमिळनाडू, दिल्ली आणि जम्मू मध्ये त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. दिल्ली येथील हंसराज कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात पदवी मिळवल्यानंतर LLB केले.  पोलिस विभागात याचा योग्य प्रकारे वापर करता यावा या हेतूने त्यांनी LLB केले. 

 

बातम्या आणखी आहेत...