Home | Flashback | Simple Kapadia Birth Anniversary

B'day: अभिनयात ठरली फ्लॉप तर डिझायनर बनली ही अॅक्ट्रेस, कॅन्सरने झाला होता मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 15, 2018, 12:00 AM IST

गतकाळातील अभिनेत्री सिंपल कापडीयाची आज 60 वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला होता.

 • Simple Kapadia Birth Anniversary

  मुंबई - गतकाळातील अभिनेत्री सिंपल कापडीयाची आज 60 वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला होता. अनेक चित्रपटांत काम करुनही सिंपल यांना यश मिळाले नाही आणि मग त्यांनी अभिनय सोडून डिझायनरचे काम सुरु केले. अनेक चित्रपटांसाठी ,सिंपल यांनी कॉस्ट्यूम डिझाईनचे काम केले. 'रुदाली' चित्रपटासाठी सिंपल यांना बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइनरचा पुरस्कारही भेटला होता. 2006 साली त्यांना कॅन्सर झाला आणि त्यामुळेच 2009 साली त्यांनी जगाला अलविदा केले.

  'अनुरोध' चित्रपटातून केला होता डेब्यू..
  सिंपल यांनी 1977 साली अनुरोध या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांचे हिरो राजेश खन्ना होते. त्यावेळी राजेश खन्ना यांचा विवाह डिंपल यांच्यासोबत झाला होता. सिंपलने सांगितले की, जीजूंसोबतच काम करत असल्याने त्यांना रोमँटीक सीन शूट करतेवेळी फार विचित्र वाटत असे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.


  पुढच्या स्लाईडवर वाचा, त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी..

 • Simple Kapadia Birth Anniversary

  10 वर्षाचे होते फिल्मी करिअर...


  सिंपल यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये 'एहसास' (1979), 'मन पसंद' (1980), 'लूटमार' (1980), 'जमाने को दिखाना है' (1981), 'दुल्हा बिकता है' (1982), 'जीवन धारा' (1982), 'तुम्हारे बिना' (1982), 'हम रहे ना हम' (1984), 'प्यार के दो पल' (1986) यांसारख्या चित्रपटात काम केले. त्यांनी 1987 साली 'परख' चित्रपटात आयटम नंबर केला. हा त्यांचा शेवटता चित्रपट होता. 


   

   

 • Simple Kapadia Birth Anniversary

  डिझायनर म्हणून झाली प्रसिद्ध...


  सिंपल यांनी चित्रपटक्षेत्र सोडल्यानंतर डिझायनर म्हणून नाव कमवले. त्यात त्यांना यशही मिळाले. त्यांनी 'इंसाफ' (1987), 'लेकिन' (1990), 'अजूबा' (1991), 'डर' (1993), 'आज की औरत' (1993), 'बरसात' (1995), 'जान' (1996), 'अजय' (1996), 'जब प्यार किसी से होता है' (1998), 'कसम' (2001), 'सोचा न था' (2005), 'नक्शा' (2006) या चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनिंगचे काम केले. मृत्यूवेळी त्यांचे वय केवळ 51 वर्षे होते. 


   

 • Simple Kapadia Birth Anniversary

  रंजीतसोबत होते अफेअर...


  असे म्हणतात की, अभिनेता रंजीतसोबत सिंपल यांचे अफेअर होते. त्याकाळी त्यांचे अफेअर फार चर्चेत होते. पण राजेश खन्ना यांना हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते. 'छैला बाबू' (1977)चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिंपलवरुन रंजीत आणि राजेश खन्नाचे भांडण झाले होते. यानंतर हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर रंजीत यांनी 1986 साली आलोका बेदीसोबत लग्न केले. 

Trending