AC मुळे चेन्नईत / AC मुळे चेन्नईत तिघांनी गमावला जीव, घरीच एसीचे हे 2 पार्ट्स स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे, घरीच करणे शक्य

दिव्य मराठी वेब टीम

Oct 05,2018 11:34:00 AM IST

युटिलिटी डेस्क - 3 ऑक्टोबर रोजी एसीतील बिघाडामुळे चेन्नईत तीन जणांचा जीव गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसी खराब झाल्याने गॅस लीक झाला आणि त्यात कुटुंबातील लोकांनी जीव गमावला. या केसमध्ये एसीतील बिघाड हे मोठे कारण ठरले. त्यामुळे एसीच मेंटेनेंस किंवा सर्व्हीस वेळेवर होणे गरजेचे आहे. पण अनेक लोक याकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच अनेकदा मोठे अपघातही घडतात.


याबाबत पॅनासॉनिक कंपनीचे एक्झिक्युटिव्ह गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, AC चा वेळेवर मेंटनन्स होणे अत्यंत गरजेचे आहे. जर ते होत नसेल तर एअर फिल्टर आणि बॅक्टेरिया फिल्टरची स्वच्छता नक्की करून घ्यावी. कारण हे दोन पार्ट्स एसीचा महत्त्वाचा भाग असतात. हळू हळू यात डस्ट जमा होत असते आणि त्यामुळे एअर फ्लो बंद होतो.


घरीच 10 मिनिटांत करा स्वच्छता
> विंडो आणि स्प्लिट AC मध्ये एअर आणि बॅक्टेरिया फिल्टर असतात. त्याची स्वच्छता करणे अगदी सोपे आहे.
> स्प्लिट AC मध्ये वरच्या बाजुला असलेल्या कव्हरला लॉक असतात. ते ओपन करून एअर फिल्टर बाहेर काढले जातात.
> त्याचप्रमाणे विंडो AC मध्येही समोरचे ग्रिल बाजुला करून आतले एअर फिल्टर काढता येते.
> एअर फिल्टरच्या मागे बॅक्टेरिया फिल्टरही असते. ते सहजपणे काढता येते.
> या दोन्ही फिल्टरमधील धूळ ब्रशच्या मदतीने स्वच्छ करून नंतर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
> धुतल्यामुळे धूळ पूर्णपणे निघून जाते आणि फिल्टरचे सर्व होलदेखिल स्वच्छ होऊन मोकळे होतात.
> फक्त 10 मिनिटांत तुम्ही याची स्वच्छता करू शकता. त्यामुळे इतर काही बिघाडही होत नाही.
> जर एअरफ्लो चांगला नसेल असेल तर ACचे इतर पार्ट्सही गरम होत नाही आणि कुलिंगही चांगले होते.

X
COMMENT