आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध काळातील सैनिकांच्या या ट्रिकने 2 मिनटात लागेल झोप, अवश्य ट्राय करून पाहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल झोप न येण्याची समस्या सामान्य झाली आहे. लोक झोपेसाठी योगापासून ते ध्यानधारणा सर्वकाही करत आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला असे एक सिक्रेट सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला दोन मिनिटात गाढ झोप लागेल. सैनिक युद्धकाळात वेळ मिळल्यास झोपण्यासाठी या ट्रिकचा वापर करतात. द इंडिपेंडेटच्या रिपोर्टनुसार ही ट्रिक यूएस आर्मी उपयोगात आणते.


आर्मी चीफने ही टेक्निक सैनिकांनी थकव्यामुळे काही चुका करू नयेत यासाठी बनवली होती. सैनिकांना पर्याप्त झोप मिळावी यासाठी या ट्रिकचा वापर करण्यात येऊ लागला.


तुम्हालाही या ट्रिकचा वापर करण्याची इच्छा असल्यास सर्वात पहिले आपल्या चेहऱ्याच्या सर्व मसल्स रिलॅक्स करा. जीभ, जबडा, डोळ्याजवळील मांसपेशींचा तणाव दूर करा. खांदे जेवढ्या खाली घेऊन जात येतील तेवढे खाली घेऊन जावेत.


अप्पर आणि लोअर आर्मही खाली घेऊन जावेत. सुरुवातीला एका नाकपुडीतून आणि नंतर दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडावा. छाती आणि पाय रिलॅक्स करा. त्यानंतर विचार करावा की, तुम्ही एखाद्या शांत तळ्याच्या काठी पडलेले आहात आणि वरती निरभ्र निळे आकाश आहे.


स्लीप एक्सपर्ट डॉ. नील स्टॅनले सांगतात, या ट्रिकने काम झाले नाही तर एक मंत्र हा लक्षात ठेवावा की, झोपायचे असेल तर मेंदू शांत आणि रिकामा ठेवावाच लागेल. किंवा या वाक्याचा उच्चार करावा- विचार करू नको...विचार करू नको...

बातम्या आणखी आहेत...