Health / फूड पॉयझनिंगवर रामबाण ठरतील हे साधेसोपे उपाय 

लिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुण आढळतात. म्हणून लिंबू- पाणी प्यायल्याने बॅक्टेरिया मरतात.

दिव्य मराठी

Jun 05,2019 12:15:00 AM IST

उन्हाळ्यात बाहेरचा आहार घेणे अनेकदा त्रासदायक ठरते. या मोसमात खाद्य पदार्थ लवकर खराब होतात आणि यामुळेच फूड पॉइझनिंगचा त्रास उद्भवतो. यापासून बचावासाठी काही टिप्स लक्षात ठेवा...


लिंबू-पाणी : लिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुण आढळतात. म्हणून लिंबू- पाणी प्यायल्याने बॅक्टेरिया मरतात. अनशापोटी लिंबू-पाणी पिऊ शकता. शक्य असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून घेऊ शकता. मात्र, पाणी स्वच्छ असावे.


दही : दही एका प्रकारे अँटिबायोटिक आहे आणि यात जरासे काळे मीठ घालून त्याचे सेवन केल्यास आराम मिळेल. यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता कमी राहते.


लसूण : लसणामध्ये अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १-२ पाकळ्या पाण्यासह घेतल्याने आराम मिळेल.


तुळस : तुळशीत आढळणारे अँटिमिकोबियल गुणधर्म सूक्ष्मजीवांचा सामना करतात. तुळस अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करता येईल. एक वाटी दह्यात तुळशीचे पान, काळी मिरी आणि मीठ घालून सेवन करू शकता किंवा चहात तुळशीचे पान टाकून सेवन करू शकता.

X
COMMENT