Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | simple trick for weight loss in marathi

या पाच मिनिटांच्या उपायाने 30 दिवसांत कमी होईल वजन

हेल्थ डेस्क | Update - Aug 07, 2018, 12:04 AM IST

लिंबू-पाणी प्यायल्याने वजन कमी होते. परंतु हे जास्त प्रभावी व्हावे यासाठी यामध्ये मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळता

 • simple trick for weight loss in marathi

  लिंबू-पाणी प्यायल्याने वजन कमी होते. परंतु हे जास्त प्रभावी व्हावे यासाठी यामध्ये मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळता येऊ शकते. दालचिनीमध्ये असे अँटिऑक्सिडंट्स असतात जे भूक कमी करतात. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित होते. दालचिनी घेतल्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो. यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन जलद कमी होते...


  काय गरजेचे? : दालचिनी पावडर, लिंबू-पाणी, मध
  काय करावे? : कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. यामध्ये अर्धा चमचा मध आणि दोन चिमूट दालचिनी पावडर मिसळून प्या.


  किती वेळा वापरावे? : रोज सकाळी उपाशीपोटी प्या. हे 30 दिवस प्यायल्याने वजन कमी होईल.
  या गोष्टीकडे ठेवा लक्ष : या ड्रिंकमध्ये दालचिनीचे प्रमाण वाढवू नका. जास्त वापरल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते.


  अजून काय करावे? : गोड खाणे टाळावे. पश्चिमोत्तानासन आणि नौकासन रोज सकाळी दहा मिनिटे करा.
  काय होतो परिणाम? : लिंबू-पाण्यात सायट्रिक अॅसिड असते.यामुळे चयापचय क्रिया वाढते. दालचिनीमधील सेनेमेल्डिहाइडने अतिरिक्त चरबी जलद कमी होते.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, कशी वापरावी दालचिनी...

 • simple trick for weight loss in marathi

  अशी वापरा दालचिनी 
  1. ब्लॅक टीमध्ये मिसळा : यामध्ये दालचिनी टाकून प्या. यामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्याने वजन लवकर कमी होते. 
  2. दुधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये : यामध्ये दालचिनी पावडरचे काही थेंब मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा कमी होईल. 

 • simple trick for weight loss in marathi

  3. अद्रकेच्या चहामध्ये मिसळा : यामध्ये दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. 
  4. दालचिनीचा चहा : पाणी गरम करून त्यामध्ये दालचिनी मिसळा. हे गाळून प्यायल्याने वजन कमी होते. 

Trending