आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्यास मदत करतील हे फूड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनियमित दिनचर्या, अवेळी जेवण्याची सवय आणि वाढता तणाव या गोष्टींमुळे सध्या कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येत आहे. परंतु हे पांढरे केस आणि पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे बनवण्यासाठी काही फूड तुमची मदत करू शकतात.  न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी आज अशाच काही पदार्थांची खास माहिती देत आहेत.


दही
यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 असते. दररोज एक वाटी दही खावे किंवा आठवड्यातून एकदा दह्यामध्ये मीठ टाकून केसांची मालिश करावी.


बीट
यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, आयर्न आणि व्हिटॅमिन C असते. सलाडमध्ये खावे किंवा याचा रस केसांना लावून मसाज करावी.


शेंगदाणे
यामधून पर्याप्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर मिळेल. रोज मुठभर शेंगदाणे खावेत. शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा खाऊ शकता.


आवळा
यामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. आवळ्याचा मुरब्बा किंवा लोणचे खावे, ज्यूस प्यावे. याच्या तेलाचे केसांची मालिश करावी.


फुटाणे
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन B आणि कॅल्शियम असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास केस काळे आणि दाट होतील.


कडीपत्ता
यामध्ये आयर्न आणि फॉलिक अॅसिडची पर्याप्त मात्रा असते. नियमितपणे आहारात कडीपत्ताचे प्रमाण वाढवल्यास लवकर पांढरे केस काळे होऊ लागतील.


चीज आणि पनीर
यामध्ये भरपूर प्रमाणत  प्रोटीन, व्हिटॅमिन B आणि कॅल्शियम असते. आहारात याचे प्रमाण वाढवल्यास केस काळे आणि दाट होतील.


मेथीदाणे
यामध्ये आयर्न आणि फायबरचे पर्याप्त प्रमाण असते. रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यावे किंवा याने केस धुवावेत.


हिरव्या पालेभाज्या
यामधून फॉलिक अॅसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन A ची पर्याप्त मात्रा मिळेल, ज्यामुळे केस काळे आणि मजबूत होतील.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर फूडविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...