Home | International | Other Country | Since the surface is cold, the moon is 50 meters short, causing the earthquake

पृष्ठभाग थंड असल्याने चंद्र 50 मीटरने झालाय लहान, यामुळे होत आहेत भूकंप

वृत्तसंस्था | Update - May 15, 2019, 09:28 AM IST

अपाेलो मोहिमेतील उपकरणांमुळे मिळाली माहिती

 • Since the surface is cold, the moon is 50 meters short, causing the earthquake

  वॉशिंग्टन - चंद्राची आतील पृष्ठभूमी थंड असल्याने तो आकुंचन पावत चालला आहे. मागील कोट्यवधी वर्षांपूर्वीपासून पृथ्वीचा हा उपग्रह ५० मीटर आकुंचला गेला आहे. यामुळे भूकंपासारखी आपत्ती येते आहे, असे अमेरिकेतील नॅशनल एअर स्पेस म्युझियमने एका अहवालात म्हटले आहे. काही भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केलपर्यंत मोजली गेली आहे. हा अहवाल नेचर जिओ सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. अमेरिकेतील नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे शास्त्रज्ञ थॉमस वेटर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या पृष्ठभूमीवर द्राक्षापासून किसमिस तयार करताना ज्या प्रकारच्या सुरकुत्या पडतात, तशा सुरकुत्या दिसून येत आहेत. मात्र, दोघातील फरक असा की, आकुंचन पावण्याने चंद्राची पृष्ठभूमी फाटल्यासारखी दिसते.


  चंद्रावर दिसत आहेत थर्स्ट फॉल्ट
  वेटर्स यांनी सांगितले, आकुंचन पावण्याने उपग्रहावर थर्स्ट फॉल्ट तयार होत आहेत. या प्रक्रियेत चंद्राची एक पृष्ठ बाजू दुसऱ्यावर चढते. यामुळे तीव्र गतीने भूकंप होत आहेत. थर्स्ट फॉल्टचा आकार शिड्यांप्रमाणे असतो. सुमारे दहा मीटर उंच फॉल्ट अनेक किमीपर्यंत पसरलेले दिसून येतात, असे त्यांनी सांगितले.


  अपोलो ११ च्या मोहिमेनुसार, चंद्रावर ठेवलेले सेस्मोमीटरने तीन आठवड्यांपर्यंत काम केेले. परंतु इतर उपकरणांतून १९६९ ते ७७ दरम्यान उपग्रहावर २८ छोटे भूकंप आले होते. रिश्टर स्केलवर याची तीव्रता २ ते ५ इतकी होती. अभ्यास आणखी थोडा खाेलवर जाऊन केला असता, यापैकी ८ भूकंप फाॅल्टच्या ३० किमी परिघातच आले होते.


  अपाेलो मोहिमेतील उपकरणांमुळे मिळाली माहिती
  वेटर्स यांनी सांगितले, अपोलो मोहीम ११, १२, १४, १५ व १६ द्वारे चंद्रावर सेस्मोमीटर्स ठेवले होते. यात मिळणाऱ्या डाटाची मोजणी केल्यानंतर शास्त्रज्ञांना चंद्रावर होत असलेल्या बदलाची व भूकंपाची माहिती गोळा केली जात आहे.

Trending