आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sindhu Has A Great Chance To Win The Finals With The World Champions In The Session

सिंधूला सत्रात वर्ल्ड चॅम्पियनसह फायनल्स जिंकण्याची माेठी संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स, उद्यापासून टाॅप-८ खेळाडू झुंजणार

नवी दिल्ली- यंदाच्या सत्रातील शेवटच्या बॅडमिंटन स्पर्धा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सला उद्या बुधवारपासून चीनच्या ग्वांगझू येथे सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत टाॅप-८ मध्ये असलेल्या खेळाडूंना सहभागी हाेण्याची संधी असते. भारताकडून पी.व्ही.सिंधूला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली अाहे. ती एकमेव या स्पर्धेसाठी भारताकडून पात्र ठरली अाहे. या स्पर्धेतील किताबाने सिंधूच्या नावे एकाच सत्रामध्ये वर्ल्ड चॅम्पियनपाठाेपाठ वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारी जगातील दुसरी बॅडमिंटनपटू हाेण्याचा विक्रम नाेंदवला जाईल. यापूर्वी चीनच्या वांग यिहानने २०११ मध्ये असा पराक्रम गाजवला अाहे. या स्पर्धेत १०.६ काेटींची बक्षिसे अाहेत. पहिल्यांदा २००८ मध्ये अायाेजन; अाता १० वर्षांनंतर स्पर्धेत बदल : सत्रातील शेवटच्या या स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली. अाता १० वर्षांत या स्पर्धेत माेठे बदल झाले. सत्रातील ३७ इव्हेंटनंतर टाॅप-८ मधील खेळाडू स्पर्धेस पात्र ठरतात. बक्षिसांच्या रकमेतही वाढ झाली अाहे.चीनचा संघ सर्वात यशस्वी; भारताला एकच सुवर्णपदक

या स्पर्धेत अातापर्यंत चीनचा संघ सर्वात यशस्वी मानला जाताे. या संघाने ११ वर्षांच्या दरम्यान अातापर्यंत या स्पर्धेत २० सुवर्णपदकांची कमाई केली. यात पुरुष एकेरीचे ३, महिला एकेरीचे ४, पुरुष दुहेरीचे १, महिला दुहेरीचे ५, मिश्र दुहेरीच्या ६ सुवर्णांचा समावेश अाहे. १० सुवर्णपदकांसह डेन्मार्क दुसऱ्या स्थानी अाहे. भारताला गतवर्षी २०१८ मध्ये सिंधूने एकमेव सुवर्ण जिंकून दिले.चॅम्पियनला अाॅलिम्पिकच्या बराेबरीत मिळतात गुण 

ही सर्वात रेटिंग गुण मिळवून देणारी बॅडमिंटन स्पर्धा अाहे. त्यामुळे या स्पर्धेतील चॅम्पियन खेळाडू हा अाॅलिम्पिकच्या बराेबरीत रेंटिग गुणांचा मानकरी ठरताे. त्याला १२ हजार रेटिंग गुणांची कमाई या स्पर्धेतील किताबाने करता येते. इतके रेटिंग गुण हे फक्त अाॅलिम्पिक अाणि वर्ल्ड चॅम्पियनला मिळत असतात. याची मदत अाॅलिम्पिक पात्रतेस हाेते.

सिंधूच्या अ गटात अव्वल मानांकित व चॅम्पियन सहभागी


साेमवारी या स्पर्धेचा ड्राॅ काढण्यात अाला. अाठव्या मानांकित सिंधूला अ गटात सहभागी करण्यात अाले. याच गटात अव्वल मानांकित चेन युफेई, २०१७ ची फायनल्स चॅम्पियन अकाने यामागुची अाणि बिंगजियाओचा समावेश अाहे. तसेच ब गटात रत्चानोक इंतानाेन, नोजोमी ओकुहारा, ताई जू यिंग, ओ बुसानन अाहे. पुरुषांच्या गटात नंबर वन केंतो मोमोता, जोनाथन क्रिस्टीचा समावेश अाहे.