आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू प्री-क्वार्टर फायनलमध्ये; सायना नेहवालचा झाला सलामीला पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेंगझाेऊ - जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या पी.व्ही. सिंधूने किताबाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुुरुवात केली. तिने बुधवारी चायना आेपन बॅडमिंटन स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे माजी नंबर वन सायना नेहवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला महिला एकेरीच्या सलामीलाच पराभवाला सामाेरे जावे लागले.

ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने सलामी सामन्यात माजी ऑलिम्पिक चॅम्पियन झुईरुईचा पराभव केला. तिने २१-१८, २१-१२ ने सामना जिंकला. यासह तिने पुढच्या फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. तसेच तिचा झुईरुईविरुद्धचा हा चाैथा विजय ठरला.  थायलंडच्या बुसाननने महिला एकेरीच्या सलामीला आठव्या मानांकित सायना नेहवालचा पराभव केला. तिने २१-१०, २१-१७ ने सामना जिंकला. यामुळे  ४४ मिनिटांत सायनाला पॅकअप करावे लागले.