आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू पहिल्या फेरीत पराभूत, सात्त्विकचा दुहेरी विजय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग : जागतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमावरील पी.व्ही. सिंधू चायना ओपनच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली. जागतिक चॅम्पियनशिपचा किताब जिंकल्यानंतर सिंधू पाच स्पर्धेत उतरली आणि कोणत्याही स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचू शकली नाही. ती चार स्पर्धेत अंतिम १६ जणांतही स्थान मिळवू शकली नाही. यादरम्यान तीने चार सामने जिंकले आणि पाचमध्ये तिचा पराभव झाला. जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावरील तैवानच्या पाई यू हिने सिंधूला तीन गेमच्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१३, १८-२१, २१-१९ ने हरवले. पुरुष एकेरीत एच.एस. प्रणय देखील पहिल्या फेरीत पराभूत झाला. डेन्मार्कच्या रेसमस गेमकेने प्रणयला सरळ गेममध्ये २१-१७, २१-१८ ने हरवले. एकेरीत सायना , कश्यप, साई प्रणीत व समीर वर्मा यांचे बुधवारी सामने हाेतील. मिर दुहेरीत सात्त्विक साई राज-अश्विनी पोनप्पा जोडीने कॅनडाच्या जोशुआ हर्लबर्ट-जोसेफीन वू जोडीला संघर्षपूर्ण लढतीत २१-१९, २१-१९ ने मात दिली. हा सामना ३५ मिनिटे चालला. पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिरागने अमेरिकन फिलिफ-रेयान जोडीला २१-०९, २१-१५ ने हरवले. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी जोडी पहिल्या फेरीतून पराभवासह बाहेर झाली.