आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sindhu, Srikanth, Saina Lose; Disappointment In Doubles: All The Players In India Are Out

सिंधू, श्रीकांत, सायनाचा पराभव; दुहेरीतही निराशा:भारताचे सर्वच खेळाडू बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - अाॅलिम्पिक पदक विजेत्या सिंधू, सायना नेहवाल अाणि के. श्रीकांतला अापली विजयी माेहीम कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे या तिघांचेही फ्रेंच अाेपन बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यांना अापापल्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  भारताच्या पदकाची मदार ही स्वस्तिकराज अाणि चिराग शेट्टीवर हाेती. मात्र, या जाेडीला  पुरुष दुहेरीच्या अंतिम चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासह या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे अाव्हान संपुष्टात अाले. 


सायना ३६ मिनिटांत पराभूत : माजी नंबर वन सायना नेहवालला महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये सुमार खेळीचा फटका बसला. तिला अवघ्या ३६ मिनिटांत पराभवाचा सामना करावा लागला. 


अव्वल मानांकित ताई यिंगने सरस खेळी करताना सायनावर एकतर्फी विजय मिळवला. तिने २२-२०, २१-११ ने सामना जिंकला. यासह तिने उपांत्य फेरी गाठली.

 
बिंगजिअाेची सिंधूवर मात :  सातव्या मानांकित बिंगजिअाेने अव्वल कामगिरीच्या बळावर सिंधूचा पराभव केला. तिने ४० मिनिटे शर्थीची झंुज देताना २१-१३, २१-१६ ने विजयश्री खेचून अाणली. यामुळे तिसऱ्या मानांकित पी. व्ही. सिंधूला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तिला प्रत्युत्तराची फारशी संधीच मिळाली नाही. यातून तिचे विजयाचे स्वप्न भंगले.  यामुळे तिलाही या स्पर्धेतून झटपट पॅकअप करावे लागले.  

बातम्या आणखी आहेत...