Home | Sports | Other Sports | Sindhu wins in 29 minutes; Ashwini-Sikki out: 2-0 win

सिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना

वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2018, 07:50 AM IST

डेन्मार्कच्या किम एस्त्रुप व अांद्रेसने सरस खेळी करताना पहिल्या फेरीत भारताच्या मनु-सुमीतला पराभूत केले.

 • Sindhu wins in 29 minutes; Ashwini-Sikki out: 2-0 win

  फुझाेऊ - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या पी.व्ही. सिंधूने मंगळवारी किताबाच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने चायना अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत अवघ्या २९ मिनिटांत एकतर्फी विजयाची नाेंद केली. दुसरीकडे भारताच्या अश्विनी पाेनप्पाला अापली सहकारी एन.सिक्की रेड्डीसाेबत महिला दुहेरीच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या जाेडीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यांचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यापाठाेपाठ मनु अत्री अाणि बी.सुमीत रेड्डीलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांना पुरुष दुहेरीच्या लढतीत पराभवाला सामाेरे जावे लागले. डेन्मार्कच्या किम एस्त्रुप व अांद्रेसने सरस खेळी करताना पहिल्या फेरीत भारताच्या मनु-सुमीतला पराभूत केले. त्यांनी ४६ मिनिटांत २१-१६, २७-२५ ने विजयाची नाेंद केली.

  सिंधूचा एकतर्फी विजय; २-० ने जिंकला सामना
  अाॅलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या सलामीला रशियाच्या एवगेनियावर मात केली. तिने २१-१३, २१-१९ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला प्री-क्वार्टर फायनलमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता हीच लय कायम ठेवताना अंतिम फेरीचा पल्ला गाठण्याचा तिचा प्रयत्न असेल. सायनाच्या अनुपस्थितीत अाता तिच्याकडून भारताला माेठी अाशा अाहे.

  अश्विनीची झुंज अपयशी; ७० मिनिटांत झाला दुहेरीत पराभव
  भारताच्या दुहेरीची अव्वल खेळाडू अश्विनीने विजयासाठी दिलेली झुंज सपशेल अपयशी ठरली. तिने अापली सहकारी सिक्कीसाेबत पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या शिहाे टनाका अाणि काेहारू याेनेमाेटाला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलाढ्य जाेडीने ७० मिनिटे झुंज देत अश्विनी-सिक्कीला पराभूत केले. त्यांनी २१-१९, १५-२१, २१-१७ ने विजय संपादन केला. त्यांनी दुसरा गेम जिंकून लढतीत बराेबरीही साधली हाेती. मात्र, त्यानंतरच्या तिसऱ्या अाणि निर्णायक गेममध्ये त्यांना समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. यातून त्यांना हा सामना गमावावा लागला.

Trending