आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये पोहोचल्या सिंधुताई सपकाळ, बिग बींनी केले विशेष स्वागत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अमिताभ बच्चन यांचा शो 'कौन बनेगा करोडपती सीजन 11' मध्ये या आठवड्यात कर्मवीर स्पेशल एपिसोड टेलीकास्ट होईल. या एपिसोडमध्ये अनेक समाजसेवक खेळतांना दिसतील. याच्या पहील्या एपिसोडमध्ये सिंगल मदर असलेल्या सिन्धुताई सपकाळ येणार आहेत. या एपिसोडचे एक प्रोमो आधीच रिलीज झाला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, जेव्हा सिंधुताई शोमध्ये येतात. तेव्हा अमिताभ बच्चन वाकून त्यांच्या पाय पडतात. या प्रोमो व्हिडिओमध्ये सिंधुताई यांच्याविषयी सांगणारी एक डॉक्युमेंटरी दाखवली गेली आहे. 

त्यांनी भारतातील सुमारे 1200 मुले दत्तक घेतली आहेत आणि त्यांचा संपूर्ण खर्च त्या करतात. व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहे की, सिंधुताई यांच्या संस्थेतील मुले त्यांच्यावर किती प्रेम करतात. तसेच त्या मुलांनीही सांगितले आहे की, सिंधुताई त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करत. सिंधुताई हेदेखील सांगितले की, त्या मुलांचे पालन-पोषण कशा करत. सिंधुताई म्हणतात, 'मी दिवसभर दूर-दूर जाऊन भाषणे करते, तेव्हा लोक माझी मदत करत. संध्याकाळी घरी येते मुलांना जेवण बनवून देते.' ही मुलेदेखील त्यांना आई म्हणून हाक मारत. सिंधुताई यांना आतापर्यंत 750 अवार्ड्स मिळाले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...