आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगुणा आणि निरोगी राहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदात असताना सहजच गुणगुणणे सुरू होते. यासाठी तुम्ही पट्टीचे गायक वगैरे असण्याची गरज नाही. या आनंदमयी गुणगुणण्याचा व सांगीतिक ज्ञानाचा काहीही संबंध नाही. हा तर हृदयातील आनंद आहे, जो सुरांच्या रूपात कंठातून व्यक्त होतो. शास्त्रज्ञही आता यास दुजोरा देतात. स्वीडनमध्ये संशोधकांनी काही निरोगी लोकांचे अध्ययन केले आाणि त्यांना दररोज काहीकाळ गुणगुणण्याचा मंत्र दिला. परिणामी त्यानंतर लोकांचा सायनसचा त्रास दूर झाला. त्यांची श्वसनक्रिया अधिक बळकट झाली व श्वसनाशी निगडित त्रास दूर झाले.
भाव ग्रंथींचा श्वसनाशी थेट संबंध असतो. राग किंवा ईर्षा अशा दुर्भावना आपण बहुतेकवेळा व्यक्त न करता आतल्या आतच दाबून ठेवतो. जेवढ्या भावना दाबून ठेवाल तेवढीच श्वसनक्रिया दीर्घ न होता उथळ होते. निरोगी शरीरासाठी श्वसनक्रिया दीर्घ असणे गरजेचे आहे. गुणगुणण्याचे स्वर हळूहळू दाबून ठेवलेल्या भावनांच्या थप्पीत प्रवेश करतात व भावना विरघळू लागतात. गुणगुणण्याचा एवढा परिणाम कसा काय होतो? कारण गुणगुणल्याने आपल्या शरीराचा रोम रोम उल्हसित होतो. गुणगुण्याचा हा झंकार तुमच्या मेंदूमधील पेशींमध्ये प्रवेश करतो आणि त्या पेशी जागृत होतात. यामुळे मेंदूचा फारसा वापरला न जाणारा भागही उत्तेजित होतो. मेंदूच्या आरोग्यासाठी हे अत्यंत लाभदायक असते. मेंदू जेवढा सक्रिय असेल तेवढा ताजेपणा जाणवायला लागतो.
तुमच्या मनात वेगळेच काही तरी विचार घोळत आहेत आणि तुमचे शरीर त्याच्या विपरित कृती करू लागले आहे, अशा अवस्थेमुळे तुम्ही तणावग्रस्त होऊन जाता. मनाची वेगळेच काही करण्याची इच्छा असते,तर शरीर काही वेगळेच करत असते. जसे शरीराला व्यायाम करायचा असतो, पण आळसावलेल्या मनाला झोपायचे असते. शरीर व मन या दोघांमध्ये चाललेल्या या संघर्षाचा परिपाक स्किझोफ्रेनियापर्यंत पोहोचू शकतो. दोघे जर एका सुरात, एका लयीत काम करतील तर जीवनात आपोआप शांतता नांदेल. मनावरचा सगळा तणाव दूर होतो, सर्व चिंता मिटतात एवढी शांतता व समाधान या स्थितीतून मिळते. हा प्रयोग करून पाहा. जरा वेळ काढून एका खोलीत डोळे बंद करून बसा व गुणगुणणे सुरू करा. दीर्घ श्वास घ्या व गुणगुणत श्वास सोडा. साधारण वीस मिनिटे असे केल्यानंतर काही वेळ मौनात बसा. तुमच्या शरीरात ऊर्जा प्रवाहित होईल. मन एवढे शांत होईल की, तुम्ही दिवसभर त्या शीतलतेचा आनंद घेऊ शकाल.