आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर : मॉलमध्ये फिरण्यासाठी बनवला २०० मीटर लांब सायकल ट्रॅक, ३२९० कोटी रुपयांचा खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - वरील छायाचित्र सिंगापूरच्या फनान मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचे आहे. येथे आलेले ग्राहक मॉलमध्ये बनवलेल्या २०० मीटर लांब ट्रॅकवर सायकलवर फेऱ्या मारू शकतात. या मॉलमध्ये तीन वर्षांपासून रिन्युएशनचे काम सुरू होते. यावर सुमारे ३,२९० कोटी रुपये खर्च झाले. ८.८७ लाख चौ. फूट विस्तीर्ण हा मॉल नव्या सुविधांसह जून महिन्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. मॉलच्या मध्यभागी ट्री ऑफ लाइफ बनवण्यात आले आहे. यामध्ये २० रिटेल पॉड असून याची रचना झाडाप्रमाणे दिसते. ग्राहकांना तणावमुक्त होण्यासाठी विशेष शॉवर केबिनही बनवण्यात आली आहे.

 

१५० लोकांची क्षमता असलेले अॅम्फिथिएटरदेखील आहे. हे नैसर्गिक लाकडापासून तयार करण्यात आलेले आहे.

येथे शहरी शेती उद्यानही आहे. येथील रेस्तराँमध्ये याच भाज्यांचा वापर होतो.

बातम्या आणखी आहेत...