आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर-न्यूयॉर्क दरम्यान १५,३४३ किमीचा पल्ला विनाथांबा विक्रमी १९ तासांत पूर्ण करणार विमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - सिंगापूर एयरलाइन्सच्या ए ३५०-९०० अल्ट्रा लाँग रेंज विमानाने गुरुवारी सिंगापूर ते न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेतले. १५,३४३ किमीचा पल्ला गाठण्यासाठी त्याला नॉन स्टॉप १९ तास लागतील. हा एक विक्रमच असेल. सध्या सर्वात लांब पल्ल्याचे १२,९७० किमीचे उड्डाण कतर एअरवेजचे विमान दोहाहून ऑकलँडला जाते. त्यासाठी १७:४० तास लागतात. सिंगापूर एअरलान्सने या सर्वात लांब पल्ल्याच्या विमान सेवेची घोषणा यंदा मेे महिन्यातच केली होती.

 

१६१ प्रवाशांना बैठक-झोपण्याची सोय
विमानात १६१ प्रवाशांना बैठक-झोपण्याची जागा आहे. आधी ही क्षमता २५३ ची होती. बिझनेस क्लाससाठी विमानात ६७ फ्लॅट-बेड सीट्स आहेत. प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये ९४ जागा आहेत.


आधीपेक्षा २५% कमी लागते इंधन
इंधनाच्या वाढत्या दरांकडे पाहता ५ वर्षांपूर्वी या मार्गावरील विमाने बंद केली होती. आता विमानाची कार्बन फायबरची विशेष बॉडी बनवण्यात आली आहे. यामुळे विमानात २५% इंधन कमी लागेल.

 

बातम्या आणखी आहेत...