आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Singapore Will Be The First Country Where No Photo ID But Facial Recognition Will Be Done

सिंगापुर पहिला देश बनेल, जेथे फोटो आयडी नाही तर चेहरा दाखवावा लागेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापुर : आतापर्यन्त ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे आणि बँकेत खाते उघडण्यासारख्या कामांसाठी फोटो आयडीची गरज पडायची. पण येणाऱ्या काळात याची गरज नसेल. सिंगापुर जगातील पहिला असा देश बनणार आहे, जेथे कोणत्याही कामासाठी फोटो आयडी नाही, तर चेहरा दाखवावा लागेल. सिंगापुरचे सरकार फेशियल रेकग्निशन टेक्निकवर काम करत आहे. याच्यांतर्गत देशभभरातील सरकारी आणि खाजगी ऑफिसमध्ये फोटो कियोस्क सिस्टम लावले जातील. जेथे केवळ चेहरा दाखवल्याने आपले काम होऊन जाईल. यामध्ये देशभरासाठी नागरिकांची ओळख आणि पत्त्यासह संपूर्ण माहिती होईल.  

सरकार याचवर्षी जूनपासून कियोस्क लावणे सुरु करेल. दावा आहे की, 2022 पर्यंत देशभरात ही सुविधा सुरु होईल. मात्र या सुविधेचा वापर यासाठी नागरिकांना ‘सिंगपास’ नावाचे एप डाउनलोड करावे लागेल.   

सुविधेमुळे लोकांचा वेळ वाचेल... 

रिपोर्टनुसार, सुविधा सुरु झाल्यामुळे लोकांचा वेळ वाचेल. सोबतच कोरोना व्हायरससारखे संक्रमणदेखील दूर राहील. मजेशीर बाब ही आहे की, सिंगापुरमध्ये हे काम स्मार्ट नेशनचे प्रभारी मंत्री डॉ. विवियन बालाकृष्णन यांच्या देखरेखीमध्ये होत आहे. डॉ. बालाकृष्णन भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी सांगितले की, सिंगापुरची लोकसंख्या तब्बल 58 लाख आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...