आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरच्या इन्स्टाग्राम क्वीनकडे आहे तब्बल 5 लाख डॉलर्सची हँडबॅग व घरासमान वॉर्डरोब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- सिंगापूरमध्ये राहणारी ४५ वर्षीय जेमी चआ पेशाने एक हवाई सुंदरी आहे. मात्र, ती परीसारखे जीवन जगते आहे. एका प्रवासदरम्यान तिची भेट घटस्फोटित पती नुर्डियन कुआसाशी झाली होती. नुर्डियन एक अब्जाधीश उद्योजक आहेत. जमी स्किन केअर आंत्रप्रेन्योर असून दोन मुलांची आई आहे. यासोबत ती सोशल मीडिया स्टारही आहे. आपल्या अनोख्या बॅग कलेक्शनमुळे तिला इन्स्टाग्रामची राणी म्हणून ओळखले जाते. सर्वात आकर्षक वस्तूमध्ये क्रॉकोडाइल स्किन डायमंड बॅग असून तिची किंमत ५ लाख डॉलर्सपेक्षाही जास्त आहे.

 

फॅशनसोबत दर्जालाही खूप महत्त्व देत असल्याचे तिचे म्हणणे आहे. ती जास्त वस्तूवर पैसा खर्च करते ती दीर्घकाळ टिकणारी असते. त्यामुळे तिचे कारागिरीवर विशेष प्रेम आहे. २७ वर्षांपूर्वीच्या रनवे पिसेसचाही तिच्या कलेक्शनमध्ये समावेश आहे. हे सध्याही नव्यासारखे वाटतात. कलेक्शन नवे वाटतात. संग्रह नवीन वाटावा यासाठी जेमीने ६०० चौ. फूटचा फिंगरप्रिंट-प्रूफ वॉर्डरोब तयार केला आहे. त्याची किंमत जवळपास १,२०,००० डॉलर्स आहे. जेमीची महागडी हँडबॅग अॅमरेज हिमालय डायमंड बर्किन बॅग आहे. या बॅगची अंदाजित किंमत ५,१२,५९० डॉलर्स आहे. ही जगातील सर्वात विरळ हँडबॅग मानली जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...