आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्कः पाकिस्तान ते भारताचे नागरिक झालेले गायक अदनान सामीला पद्मश्री देण्यावरून काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. त्याचा विरोध करणाऱ्या लोकांना वाटले की हा वाद सर्वदूर पसरल्यामुळे गायक पूर्णपणे निराश झाला असेल, परंतु या धारणेला चुकीचे ठरवत अदनान संगीताच्या जगात पुन्हा एकदा तयार आहे. बऱ्याच कालावधीनंतर गायनापासून दूर राहिल्यानंतर अदनान आता लाखो चाहत्यांना पुन्हा आपल्या गायकीची भेट देण्यासाठी तयार आहे. तो टी सिरीजच्या भूषण कुमारद्वारे निर्मित एक सुंदर ट्रॅक, 'तू याद आया'सह दीर्घ काळाच्या ब्रेकला विराम देत आहे. हा ट्रॅक एक कंटेम्पररी, सोलफूल मेलोडी आहे. ज्यात अदनानची नेहमीची स्टाइल आणि त्याची विशेष जादू दिसून येईल. या गाण्याला अरविंद खैराने दिग्दर्शित केले आहे. गीत आणि संगीत कुणाल वर्मा यांनी दिले आहे. याचा एक भावनात्मक व्हिडिओदेखील पाहायला मिळणार आहे, ज्यात अदनानसोबत अभिनेत्री अदा शर्मा दिसेल.
खास बाब ही आहे की, अदनानला आतापर्यंत जी प्रसिद्धी आहे ती त्याच्या चित्रपटातील गीतांनी नव्हे तर त्याच्या अल्बममुळे आणि एकट्याने गायलेल्या गीतामुळे मिळाली आहे. 'मुझको भी तो लिफ्ट करा दे' और 'तेरा चेहरा'सारख्या चार्टबस्टर्ससोबत त्याने संगीताच्या जगात धुमाकूळ माजवला आहे.
'चला आता काम करुयात'
या बाबतीत चर्चा करताना अदनान म्हणाला, काही दिवसांपूर्वी ज्यावेळी पद्म पुरस्काराची घोषणा झाली होती, त्यावेळी मी खूप आनंदात होतो. परंतु यापूर्वी मी दीर्घकाळापर्यंत विश्रांती घेतली होती. एक संगीतकार, गायक किंवा कोणताही व्यक्ती सार्वजनिक रुपात कोणतेही काम करत नसेल तर याचा नक्की विचार करतो की, पुढे काय होईल. भूषण कुमार टी-सीरीज आणि माझे खूप जुने आणि प्रेमाचे नाते आहे. हे नाते जवळपास मागील 20 वर्षांपासून जपले आहे. आम्ही मागील काही दिवसांपासून एकत्र काम करण्याची चर्चा करत होतो. यादरम्यान मलादेखील जाणवले की आता खूप विश्रांती झाली. चला आता जोमाने कामाला लागू या आणि त्यानंतर सुरू झाला 'तू याद आया'चे काम.
टी सिरीजचे हेड भूषण कुमार म्हणाले, अदनान आपल्या चित्रपटसृष्टीत चांगल्या प्रतिभांपैकी एक आहेत. आमच्यामध्ये मागील दोन दशकांपासून खूप चांगले नाते आहे. आम्ही एकत्र एक गाणे करण्याचा विचार करतो आहे, ते गाणे मेलोडियस, रोमांटिक ट्रॅकचे आहे. जे खरंच एक चांगले आणि वेगळे गाणे असेल. आम्हाला या गाण्याबाबत खूप विश्वास आणि आशा आहे की, अदनान आणि आम्ही एकसाथ कित्येक प्रोजेक्ट एकत्र करू.
दिग्दर्शक अरविंद खैरा म्हणाले, अदनान सामीसोबत या गाण्याचे चित्रीकरण करणे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ते एक लीजेंड आहेत आणि पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवतात. त्यांच्याकडे आमच्यासाठी काही चांगले सल्ले होते. त्यांची सर्जनशीलता फक्त गाणे तयार करणेे आणि ते गाणे यापलीकडे आहे. ते याला उत्कृष्ट दृश्यात्मक बनवण्यासाठीही सहभागी होतात. त्यांचा हा दृष्टिकोन या गाण्यात दिसून येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.