आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Singer Anuradha Poudwal Refuses The Accusation Of Kerala Woman Who Claims That Anuradha Is Her Biological Mother

अनुराधा पौडवाल यांनी केरळच्या महिलेची बायोलॉजिकल आई असल्याच्या दाव्याचे केले खंडन, डीएनए चाचणीच्या प्रश्नावर भडकल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केरळच्या करमाला मोडेक्स नावाच्या महिलेने ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या तिच्या आई असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पण, अनुराधा पौडवाल यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. दैनिक भास्करसोबतच्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला. त्या म्हणाल्या की, "त्या महिलेची ही मानसिक दिवाळखोरी आहे. प्रकरणात काहीच तथ्य नाही. उद्या कोणी तुमच्यावर आई किंवा पत्नी असल्याचा दावा करेल."
मूळची तिरुवनंतपुरमची असलेल्या 45 वर्षीय करमालाने दावा केला आहे कि, 67 वर्षांच्या अनुराधा पौडवाल तिची बायलॉजिकल आई आहेत. तिने जिल्हा कौटुंबिक न्यायालयात तक्दारार खल करून अनुराधा यांच्याकडे 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागणी केली आहे.

डीएनए चाचणीच्या प्रश्नावर भडकल्या अनुराधा पौडवाल


करमालाचे वकील अनिल प्रसादचे म्हणणे आहे की, 'जर पौडवाल तिच्या दाव्याचे खंडन करत आहेत, तर ते डीएनए टेस्टची मागणी करतील.' जेव्हा यावर अनुराधा यांना प्रतिक्रिया मागितली गेली तेव्हा त्या भडकल्या. "एखादे कुत्रे जर उठून भुंकत असेल तर तुम्ही माझ्या कडून ही अपेक्षा नाही करू शकत की, मीदेखील भुंकावे. माझी स्वतःची मुलगी (कविता) 1997 मध्ये जन्मली आहे."


मला कायदेशीर गुंतागुंतांविषयी काहीच माहिती ना
ही

जेव्हा अनुराधा यांना विचारले की, त्या आपल्या वकिलाच्या साहाय्याने कोणते पाऊल उचलत आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या की, "जेव्हा काही करेल तेव्हा कळेलच. मी सध्या याबद्दल काहीही बोलू शकत नाही. मला कायदेशीर गुंतागुंतींविषयी जास्त माहिती नाही. पण, अशी परिस्थितीशी यापूर्वी कधी डील केली नाही. हे लोक निश्चितच वसुली करणारे आहेत. मला जाणून घ्यायचे आहे की, अखेर कोणत्या आधारावर कोर्टाने खटला दाखल करुन घेतला आहे. न्यायालय अशी प्रकरणे स्वीकारत राहील आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना सोडत राहील का?"

 

हा आहे करमालाचा दावा

करमालाचा दावा आहे की, अनुराधाने तिला 4 दिवसांची असताना पालनकर्ते माता-पिता पोंनाचन आणि अगनेस यांच्याकडे दिले होते. तिने हेदेखील म्हटले आहे की, पालक पिता अनुराधा यांचे खास मित्र होते आणि लष्करामध्ये असताना त्यांची महाराष्ट्रात बदली झाली होती. नंतर वडिलांची बदली केरळला झाली. मृत्यूपूर्वीच पोंनाचनने तिला अनुराधा तिची खरी आई असल्याचे सांगितले. दरम्यान. आता या सर्वांवर अनुराधा पौडवाल काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.