आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Singer Guru Randhawa Was Attacked By An Unknown Person When He Was Coming Back From Concert

कॉन्सर्टमधून बाहेर पडलेल्या सिंगर गुरु रंधावावर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला, थोडक्यात वाचला जीव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिंगर गुरु रंधावावर कॅनडा मध्ये हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरु रविवारी रात्री जेव्हा एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करून परतत होता तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. गुरु जेव्हा क्वीन एलिजाबेथ थिएटरमधून बाहेर पडत होता तेव्हा एका व्यक्तीने त्याच्या डोक्यावर मागून आघात केला. या हल्ल्यामध्ये गुरु थोडक्यात बचावला आहे आणि त्याला जास्त जखम झाली नाही. घटनेच्या ठिकाणी त्वरित अँब्युलन्स पोहोचल्यामुळे गुरुला प्राथमिक उपचार लवकर मिळाले. 

 

कॉन्सर्टमध्येदेखील रागात होता व्यक्ती... 
रिपोर्टनुसार, कॉन्सर्टमध्ये असलेल्या लोकांकडून हे कळाले आहे की, ज्या व्यक्तीने गुरुवर हल्ला केला. तो कॉन्सर्ट पाहताना देखील चूप चिडलेला होता आणि रागीट प्रतिक्रिया देत होता. पोलिसांना अद्याप त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.   

 

सिंगर प्रीत हरपालने शेअर केला जखमी गुरुचा फोटो... 
पंजाबी गायक-अभिनेता प्रीत हरपालने या घटनेची माहिती फेसबुकवर देत जखमी असलेल्या गुरुचे फोटो शेअर करून लिहिले, 'माहित नाही, समाज कोणत्या दिशेला जात आहे.' सांगितले जात आहे की, कॉन्सर्टमध्ये गुरुसोबत प्रीतदेखील होता. गुरुने लाहौर, पटोला, हाय रेटेड गबरू यांसारखे हिट पंजाबी गाणे गायले आहेत.