आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: 'त्याचा हात माझ्या मांडीवर होता, भेटण्यासाठी खोलील बोलावले होते', कैलाश खेरवर सिंगरचा शोषणाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'अंबर सरिया' आणि 'मुझे क्या बेचेगा रुपैया' अशी गाणी गायलेल्या सोना मोहापात्राने 45 वर्षीय सिंगर कैलाश खेरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. सोनाने एकापाठोपाठ एक अनेक ट्वीट करत तिचा #MeToo मोमेंट शेअर केला. तिने आधी ट्वीटमध्ये लिहिले, मी कैलाशला एका कॉन्सर्टच्या निमित्ताने पृथ्वी कॅफेमध्ये भेटले होते. आमच्या दोघांचे बँड परफॉर्म करणार होते. त्याने हात माझ्या मांडीवर ठेवला आणि म्हटले, तू खूप सुंदर आहेस..बरे वाटले तू एका म्युझिशियन (राम संपत) ला भेटली, अॅक्टरला नाही. नंतर मी तिथून निघून गेले. 

 

(1) I met Kailash for coffee in Prithvi Café to discuss a forthcoming concert where both our bands were playing & after the usual, a hand on my thigh with lines likes, your so beautiful, feel so good that a ‘musician got you’ (Ram) not an actor. I left not soon after. (1) https://t.co/Cfz8Hf4sdP

— SONA (@sonamohapatra) October 9, 2018

सोना म्हणाली, कैलाशने खोलीत बोलावले होते..  
सोनाने दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, त्याला समजले नाही. आम्ही ढाक्याला पोहोचल्यानंतर आयोजकांबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते तेव्हा त्याचा फोन आला. मी फोन उचलला नाही तर त्याने आयोजकांना फोन करून मला देण्यास सांगितले. साऊंडचेकसाठी न जाता त्याला भेटायला त्याने मला खोलीत बोलावले. 

(2) That did not deter Kailash Kher though. On landing in Dhaka & on my way to the venue with the organisers, keeps calling me & when I don’t pick up, calls the organisers phone to get through to me & asks me to ‘skip’ the soundcheck & join him in his room instead to ‘catch up’ https://t.co/beBehXBLup

— SONA (@sonamohapatra) October 9, 2018

 

सोनाने तिसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, फॅक्ट तर ही आहे की, कैलाशने माझ्या स्टुडिओत अनेक गाणी गायली आहेत. मी त्यांची प्रोड्युसर राहिली आहे. एक तर त्याला माहिती होते की मी किती स्ट्राँग आहे किंवा त्याने माझा पार्टनर राम संपतला यासाठी फेव्हरमध्ये घेतले होते की त्याला स्थान मिळवता यावे. 

3)The fact that Kailash had sung in my studios & for many projects in which I was the producer & knew me to be as strong as i am or that he had only recently taken a favour from my partner @RamSampathLive to create a personal track for him didn’t stop him. #TheHubris of such #men https://t.co/GLHvCsIPDR

— SONA (@sonamohapatra) October 9, 2018

प्रश्न विचारणाऱ्यांवर भडकली सोना 
जब सोनाच्या #MeToo मोमेंटनंतर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ती आतापर्यंत का शांत राहिली, आता का बोलतेय असे प्रश्न विचारले. ती या प्रश्नांवर भडकली, ट्वीटरवर तिने पोस्ट केले, ज्यांना हे प्रश्न पडले असतील, त्यांना मी सांगू इच्छिते माझे जीवन, माझी आवड आता काय म्हणता.. प्रत्येक घाणेरड्या गोष्टीबद्दल ट्वीट करू लागले तर संपूर्ण जीवन तेच करत राहावे लागेल. हाच फुल टाइम जॉब होईल. 

To all the people accusing me of being so late about bringing up Kailash Kher’s bad behaviour. I say...
my life.
my choice.
Now go, buzz off.
(P.S if I started tweeting about every creep I encounter in life here, I would be doing this job full time)

— SONA (@sonamohapatra) October 10, 2018

 

फोटो जर्नालिस्टनेही केला आहे आरोप 
सोना मोहापात्रापूर्वी नताशा हेमरजानी नावाच्या एका फोटो जर्नलिस्टनेही कैलाश खेर यांच्यावर सेक्श्युअल हॅरेशमेंटचा आरोप केला आहे. 2006 मध्ये एका मुलाखतीसाठी कैलाश खेर यांच्या घरी गेली असता तो माझ्या आणि एका महिला पत्रकाराच्या मध्ये येऊन बसला आणि आमच्या मांड्यांवर हात ठेवला असे ती म्हणाली होती. 

बातम्या आणखी आहेत...