आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही फेमस पॉप सिंगर आइस बाथनंतर पिते युरिन, व्हिडिओ शेअर करुन सांगितले फायदे 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध पॉप गायिका मेडोना हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत ती आइस बाथनंतर एक कपभर युरिन पिताना दिसतेय. सोशल मीडियावर मेडोनाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.  

मेडोनाना रविवारी हा व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिले,  ICE TRAY-NEW DRIP-3:am Ice bath आपण एकत्र आइस बाथ चॅलेंज सुरु करुयात का? 41 डिग्री, दुखापतीमधला सर्वोत्तम उपचार. व्हिडिओत मेडोना परफॉर्मर अहल मलिक विलियम्ससोबत हॉटेलच्या बाथरुममध्ये दिसतेय. 

आइस बाथ टबमधून बाहेर आल्यानंतर मेडोनाने सर्वप्रथम पायातील मोजे काढले आणि नंतर कपभर पिवळ्या रंगाचा द्रव प्राशन केला. तिच्या मते, बर्फाच्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर युरिन पिणे फायदेशीर असते. विशेष म्हणजे मेडोनाने औषधोपचार म्हणून युरिन पिण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिने पायाची जखम बरी करण्यासाठी युरिनचा वापर केला होता.