आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड सिंगर मिका सिंगला दुबईत अटक, ब्राझीलियन तरुणीला पाठवले होते अश्लील फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बॉलिवूड सिंगर मिका सिंगला दुबईत अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. एका ब्राझीलियन तरुणीला अभद्र फोटो पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

रिपोर्टसनुसार, गुरुवारी पहाटे 3 वाजता बुर्ज दुबईमधून अटक करण्यात आली आहे. मुरक्काबाद पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये सध्या मिकाला ठेवण्यात आले आहे. 17 वर्षीय ब्राझीलियन तरुणीने पोलिसांत मिकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मिका दुबईत परफॉर्मन्ससाठी आलेला होता. दरम्यान, मिकाच्या सुटकेसाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे.

 

मिकाने राखीला केला होता किस...
मिका आणि वाद नवे नाहीत. सन 2006 मध्ये आयटम गर्ल राखी सावंतला त्याने आपल्या वाढदिवशी केक कापल्यानंतर जाहीर लिपलॉक केले होते. यावरून मोठा गोंधळ उडाला होता. यासाठी राखी कोर्टातही गेली होती. अनेक दिवस हे प्रकरण मीडियामध्ये होते.

 

लाइव्ह इव्हेंटमध्ये डॉक्टरला मारली थापड
2015 मध्ये नवी दिल्लीतील एका लाइव्ह इव्हेंटमध्ये मिकाने एका डॉक्टरला थापड मारली होती. मनाई करूनही डॉक्टर फिमेल क्राउडसोबत डान्स करत असल्याचा आरोप होता. यामुळे चिडलेल्या मिकाने लाइव्ह इव्हेंटमध्ये त्याला थापड मारली. दुसरीकडे, 2014 मध्ये एका हिट अँड रन केसमध्येही मिका अडकलेला आहे. मिकावर ऑटो रिक्षाला धडक दिल्याचा आरोप होता. या घटनेत प्रवाशांनाही दुखापत झाली होती. 


कस्टम चोरीचाही आरोप
मिकावर कस्टम चोरीचाही आरोप होता. 2013 मध्ये त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई एअरपोर्टवर अडवले होते. मिका बँकॉकहून मुंबईला येताना निश्चित मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलन घेऊन येत होता. यामुळेन ग्रीन पॅनल पार करताना त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. तथापि, नंतर त्याला जामीन मिळाला.

 

मिकाच्या सुटकेसाठी राखी जाणार दुबईला
मिकाच्या अटकेबाबत राखीला जेव्हा कळले तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडिओ पोस्ट केला. राखी यात मिकाच्या अशा वागण्यामुळे रडताना दिसत आहे. राखी म्हणाली- मिका तू किती भानगडी करतोस... मी दुबईचा व्हिसा शोधतेय. आता मी येत आहे तुला सोडवण्यासाठी." तर आपल्या यूट्यूब चॅनलवर राखी मिकाबाबत बोलताना म्हणाली- "तू माझा मित्र आहेस, माझ्याशी का खेळत आहेस..."

 

बातम्या आणखी आहेत...