• Home
  • News
  • Singer Mika Singh will Construction of 50 houses in flood affected Sangli Kolhapur

sangli flood / गायक मिका सिंग 'जय हिंद, जय महाराष्ट्र' म्हणत पूरग्रस्तांच्या मदतीस सरसावला; सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरे बांधून देणार

मिका सिंगने पूरग्रस्त भागात घरे बांधण्याच्या आश्वासनासोबत मदत करण्यासाठी देशातील जनतेला केले आवाहन

दिव्य मराठी वेब

Aug 17,2019 10:52:00 PM IST

मुंबई - गायक मिका सिंगने सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना 50 घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. मिकाने पाकिस्तानमध्ये परवेज मुशर्रफच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यामुळे सोशल मीडिया युझर्सनी त्याला धारेवर धरेल होते. इतकेच नव्हे तर सिनेवकर्स इंडियन असोसिएशनने देखील मिकावर बंदी घातली आहे. या प्रकरणामुळे वादात असलेल्या मिका सिंगने आता जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात सरसावला आहे.


मिका सिंगने पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे येण्यासाठी देशातील जनतेला केले आवाहन

मिका म्हणाला, "मराठी चित्रपटसृष्टी संबंधित एनजीओ चांगले काम करत आहे. माझ्यातर्फे पूरग्रस्त भागात 50 घरे बांधून देण्याचे मराठी बांधवांना आश्वासन देतो. संपूर्ण देशाने या मदतीसाठी एकत्र यावे. विशेषतः माझ्या बॉलिवूडमधील मित्रांनी हात दिला बरीच मदत होईल. मी 50 घरे बांधणार आहे. तुम्ही जर मदत केली तर ही संख्या हजारांवर पोहचू शकते. संपूर्ण देशाने मदत केली तर पूरग्रस्त भागात हजारो घरे बांधून होतील. जय महाराष्ट्र, जय हिंद''

पाकिस्तानातील परफॉर्ममुळे वाद

मिकाने पाकिस्तानात कार्यक्रम सादर केल्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यावर टीका केली होती. मिकाने गेल्या 8 ऑगस्ट 2019 रोजी कराची येथे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफच्या जवळील नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केला होता. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व संबंध तोडले आहे. असे असूनही मिका सिंहने देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले. यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने बंदी घातली आहे.

X
COMMENT