आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेणाणींनी स्वरांतून उलगडली वाजपेयींची सुंदर काव्यगाथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हिंदू तन मन हिन्दू जीवन रग रग, रोते रोते रात सो गई, हम जंग नही होने देंगे अशा देशभक्ती, मानवतावादी, विशाल हृदयाचे कवी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा संपूर्ण प्रवास शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी गीत नया गाता हू या संगीतमय कार्यक्रमातून उलगडला. 


बुधवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये बाबूराव बसवंती ट्रस्ट संचलित अटलजी प्रतिष्ठानच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांच्या मेरी ५१ कविता या संग्रहावर आधारित काव्यगीतांचा कार्यक्रम झाला. पद्मश्री पद्मजा फेणाणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील अनमोल कवितांचा गीतरूपी नजराणा पेश केला. प्रत्येक कवितेला गीतरूपाने स्वरबद्ध करून सादर केल्याने रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या वेळी जुन्या आठवणी त्यांची झालेली भेट अशा अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकत अटलबिहारी वाजपेयी हे मनस्वी विशाल मानवतावादी आणि किती संवेदनशील होते याबाबतची उदाहरणे सांगत फेणाणी यांनी हळूवारपणे गीतांचे सादरीकरण केले. 


सुरुवातीला तबलावादक नागेश भोसेकर, शास्त्रीय गायिका सोनाली बोरकर, ध्वनी संयोजक राजू दाभोळकर, सन्मित्र रणदिवे, सिंथेसायझर वादक जयंत पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचा सत्कार आयोजक ज्योत्स्ना बसवंती यांनी केला. कार्यक्रमात पुढे परबत की वरमाला, क्या सच हैं क्या शिव क्या सुंदर, ना मैं चुप हू ना मैं गाता हूं हिमानी झील के तट पर अकेला गुनगुनाता हु गीत नया गाता हूँ टूटे हुए तारो से पूछे मौसम के स्वर या अशा अनोख्या आणि अद्भुत गीतांनी संपूर्ण कार्यक्रम भारावला होता. प्रास्ताविक वीरभद्रेश बसवंती यांनी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर म्याकल यांनी केले. 


.... अन्् सभागृह टाळ्यांनी कडकडले 
प्रा. दीपक देशपांडे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनी रामावरील भाषणाच्या नकलेस टाळ्यांनी दाद मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...