आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर; 'लतादीदी, आशादीदींचा आशीर्वाद पाठीशी'- सुरेश वाडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्रालयाकडून फोनद्वारे माहिती मिळाली- वाडकर

मुंबई- आपल्या आवाजाने जेष्ठांसह तरुणानाही भुरळ पाडणारे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वाडकर यांना भारत सरकार कडून देण्यात येणारा पद्म पुरस्कार श्रेणीतील तिसरा सर्वोच्च 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर झाला आहे. याबाबत सुरेश वाडकर म्हणाले की, हा लतादीदी, आशादीदी यांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले. 

सुरेश वाडकरांनी मराठी आणि हिंदीत शेकडो गाणे गायले आहेत. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है यासारखी अनेक गाण्याना आवाज देऊन वाडकरांनी आजरामर केली आहेत. 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला होता. 2011 मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
 

बातम्या आणखी आहेत...