आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉझिटिव्ह - जवळच्या मित्रासोबत संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. आसपासचे लोक आणि त्यांच्या गरजांची काळजी घ्या. कुटुंब आणि प्रॉपर्टी संदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे. मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करा. परंतु, लोक काय म्हणत आहेत याचाही विचार करा. लोक आपल्याला काही सांगण्यासाठी खूप उत्सूक राहतील. ऑफिसमध्ये टीम भावनेने काम कराल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मुला-बाळांकडून मदत मिळू शकते. चंद्र गोचर कुंडलीच्या दहाव्या भावात आहे. त्यामुळे, आपल्याला मित्र आणि भावांचे सहकार्य लाभू शकते. ऑफिसमध्ये सोबतच्या लोकांच्या कामात आपण मदत करू शकता. विरुद्ध लिंगी सहकारी आपल्या पक्षात राहण्याची शक्यता आहे.
निगेटिव्ह - प्रवासाचे एखादे कार्यक्रम पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एखाद्या स्वरुपाचा उशीर होण्याचा योग आहे. अज्ञात भीतीने आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. आपल्या मनातील गोष्टी प्रत्येकासमोर व्यक्त करू नका. प्रत्येकावर विश्वास ठेवणे टाळा. आपल्याला एखाद्या स्वरुपाचा दगा सुद्धा मिळू शकतो. प्रॉपर्टीच्या बाबतीत कुणावरही पूर्णपणे विश्वास ठेवू नका.
काय करू नये - तुटल्या किंवा फुटलेल्या भांड्यांचा वापर करू नका.
लव्ह लाइफ - लव्ह लाइप चांगली आहे. जोडीदारासोबत फिरण्यासाठी जाऊ शकता. गिफ्ट मिळू शकते. आपल्या समस्या दुसऱ्यांसमोर व्यक्त कराल तर काहीसा दिलासा मिळू शकतो.
करिअर - प्रोफेशनसलाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. धन लाभाचा योग जुळत असला तरीही खर्च सुद्धा वाढण्याचे संकेत आहेत. कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.
हेल्थ - आरोग्यावर दुर्लक्ष करू नका. कफ आणि पित्ताचे रोग होऊ शकतात. रोग जुना असल्यास दुसऱ्या एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.