आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 Dec 2018: काहीशी अशी राहील सिंह राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे सिंह राशिफळ (5 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - कुटुंब आणि मुलांसोबत सुखात वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. इतरांचे सल्ले आणि गरजांवर लक्ष द्या. आज आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. एकदा स्वतःवरील ताबा मिळवला की आपली सगळीच कामे पूर्ण होतील. बदल होण्याचाही दिवस आहे. जे बदल आपण अनेक दिवसांपासून टाळत आलात ते घडण्याची शक्यता आहे. एखादा नवीन मित्र मिळू शकतो. धार्मिक स्थळी जाण्याचे मन होईल. 


निगेटिव्ह - गोचर कुंडलीच्या चौथ्या भावात चंद्र असल्याने कामकाजात अडथळे येऊ शकतात. आपण काहीसे त्रस्त राहाल. महत्वाकांक्षा पूर्ण नाही होऊ शकल्याने दुखी राहाल. मन हेलावणारी एखादी जुनी गोष्ट समोर येऊ शकते. मित्र, पार्टनर, मूल, कुटुंब यातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कामाचे ओझे वाढू शकते. नशीबाची साथ मिळण्याची शक्यता कमीच आहे.


काय करू नये - ऑनलाइन शॉपिंग किंवा देवाण-घेवाणीचा व्यवहार करू नका.


लव्ह - लव्ह लाइफची परिस्थिती व्यवस्थित करू शकणार नाहीत. त्यामुळे काहीसे अस्वस्थ राहाल. काही वेळासाठी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.


करिअर - पैसा गुंतवण्यापूर्वी सावध राहावे लागेल. नोकरीपेशा लोकांसाठी दिवस सामान्य राहील. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मेहनत केल्यास यश मिळेल. 


हेल्थ - दिवसभर आरोग्याची चिंता राहील. ब्लड प्रेशरच्या रुग्णांना काहीसा त्रास होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...