आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशिफळ, 12 Oct 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे सिंह राशिफळ (12 Oct 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आपल्यात ऊर्जेचा स्तर सामान्य राहील. इतरांसोबत वर्तनात आपण डोक्याचा वापर कराल. सोबत काम करणारे लोक आज आपली मदत करू शकतात. एखाद्या नवीन योजनेबद्दल विचार करू शकता. धैर्य बाळगून वादापासून दूरच राहा. आपण शांततेने बोलल्यास लोक आपलेच कौतुक करतील. 


निगेटिव्ह - कुठलाही विशेष करार किंवा मोठा सौदा करू नका. एखादा निर्णय नाही घेतल्यामुळे किंवा निकाल अंधातरी लटकल्याने आपण काहीसे अस्वस्थ राहू शकता. दिवस आपल्यासाठी तेवढाही चांगला नाही जेवढा आपण विचार करत आहात. दिवसभर कुठे ना कुठे अडथळे येत राहतील. उत्साहात येऊन कुणालाही न मागता सल्ला देऊ नका. गोचर कुंडलीच्या चौथ्या भावात चंद्र असल्याने आपल्याला अचानक तोटा होऊ शकतो. 


काय करावे - गोड भातात केसर टाकून खावे.


लव्ह - आपण काही बोलला नाहीत तरीही पार्टनर आपल्या मनातील गोष्ट समजून घेईल. प्रेम वाढेल. दांपत्य जीवनात गोडावा निर्माण होईल. एकूणच लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. 


करिअर - उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज चांगले ग्राहक असतील. कामाच्या ठिकाणी सुखद वातावरण राहील. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचा योग आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीवर यश मिळेल. 


हेल्थ - अॅसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास राहील. कमीच जेवा. आरोग्याच्या बाबतीत जरा सावध राहा.

बातम्या आणखी आहेत...