Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 30 Aug 2018

30 Aug 2018, सिंह राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

सिंह राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • सिंह आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  आजचे सिंह राशिफळ (30 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक उदार आणि मोठ्या मनाचे असल्यामुळे आज काही लोकांची मदत करतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. या व्यतिरिक्त आज राग आणि चिडचिड करण्यापासून दूर राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - काही बाबतींत खूप विचारपूर्वक आपण एका निष्कर्शावर पोहोचाल. आपल्या व्यवहार लवचिक स्वरुपाचा ठेवा. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली योजना आपल्यासाठी फलदायी ठरू शकते. गरज पडल्यास लोकांचा सल्ला घेण्यात संकोच करू नका. बिझनेसमध्ये चांगला विचार करूनच निर्णय घ्या त्यातून आपल्याला फायदा होईल आणि इतरांवर सुद्धा आपला सकारात्मक प्रभाव पडेल. कुटुंब आणि इतरांची मदत मिळू शकते.


  निगेटिव्ह - गोचर कुंडलीत चंद्र आठव्या भावात असल्याने अचानक धनहानी होऊ शकते. खर्च वाढत राहील. आसपास राहणाऱ्या लोकांशी आपले वाद देखील होऊ शकतात. प्रवास कार्यक्रम अचानक ठरवण्यापासून दूर राहा. अशाने अवाजवी खर्च करण्यापासून वाचाल. मनात काही चढ-उतार येऊ शकतात. यातून आपल्याला घबराट होऊ शकते. जवळपास राहणाऱ्या लोकांचा व्यवहार किंवा आपले विचार त्रास वाढवू शकतात. आपल्या प्रकरणांमध्ये कुणी विनाकरण दखल देऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार काम करू शकणार नाही. विचारांसह भावनांची ताळमेळ बसणार नाही. त्यामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये वाद होऊ शकतात.


  काय करावे - एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची मदत करा.


  लव्ह - आपल्याला विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. पार्टनरच्या भावनांचा आदर करा. लव्ह लाइफच्या समस्या दूर होत असल्याने आपल्यासाठी दिवस चांगला राहील.


  करिअर - नव्या व्यवसायाची रूपरेषा ठरवण्याचा योग आहे. शिक्षणात कठोर मेहनत घ्यावी लागेल. लवकरच चांगले परिणाम मिळतील.


  हेल्थ - आरोग्यासंदर्भात सावध राहा. कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

Trending