आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Singham Seems To Be More Powerful To People, While Chulbul Entertains Them' Says Ajay Devgan

'सिंघम लोकांना जास्त दमदार वाटतो, तर चुलबुल त्यांचे मनोरंजन करतो' - इंडस्ट्रीतील दाेन माेठ्या पाेलिसांच्या पात्रावर म्हणाला अजय देवगण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अजय देवगणने आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या शैलीत पोलिस अधिकाऱ्याची भूूमिका साकारली. २००३ मध्ये 'गंगाजल' आणि नंतर २०११ मध्ये 'सिंघम. यात त्याच्या पोलिसाची शैली लाेकांना खूप आवडली. सिंघमच्या पात्राला इतके प्रेम मिळाले की, यावर फ्रँचायझी बनली. दिव्य मराठीसोबत झालेल्या एका मुलाखतीत त्याने स्वत: साकारलेले पोलिसाचे पात्र आणि इंडस्ट्रीतील इतरांनी साकारलेल्या पोलिस पात्रांचा फरक सांगितला...

अजय देवगणने 'सिंघम' चित्रपटात एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याचे सशक्त पात्र साकारले होते, तर सलमान खाननेदेखील 'दबंग'मध्ये भ्रष्ट मात्र चांगल्या मनाच्या अधिकाऱ्याचे पात्र 'चुलबुल पांडे' साकारले होते. या दोन्हीमधील फरक सांगताना अजय म्हणाला, सिंघमने लोकांच्या मनात असलेल्या पाेलिस पात्राची धारणा बदलली. त्याला रॉबिनहूड पोलिस म्हणता येणार नाही, पण ती एक सशक्त व्यक्तिरेखा होती. तर चुलबुल पांडे लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. प्रेक्षकांना पाेलिसांचे पात्र मोठ्या प्रमाणात आवडते. त्यातही ते मनोरंजन करणारे असेल तर लोकांना ते नक्कीच आवडते.

कोणतेही पात्र आत्मसात करतो, त्यासाठी मला वेळ लागत नाही..

चित्रपटातील आपले पात्र साकारण्याविषयी अजय म्हणाला, सुरुवातीला मी पात्र आत्मसात करत नव्हतो, मात्र आता करायला लागलो आहे. यात एक साधा फंडा मी वापरतो, मी पात्राप्रमाणे विचार करू लागतो. उदा- पात्र अडचणीत आले किंवा त्याच्यासोबत काही घटना घडली तर त्या वेळी तो कसा रिअॅक्ट होईल. याचा मी विचार करतो. 'जख्म' चित्रपटाच्या वेळी मी भट्ट साहेबांना सांगितले होते की, मला माझ्या पात्रानुसार कॅमेऱ्यासमोर व्यक्त होऊ द्या. पात्राच्या चेहऱ्यावर दु:ख दिसले तर चांगले नाही तर बॅड लक. त्यांनी होकार दिला. त्यानंतर लोकांनादेखील ते पात्र आणि चित्रपट आवडला. सिंघम अडचणीत आल्यावर कसा व्यक्त होईल आणि 'तान्हाजी'देखील काय विचार करेल याचा मी विचार करतो आणि तसेच व्यक्त होतो. ती माझी पद्धत आहे. पात्र साकारताना अजय देवगण कसा व्यक्त होईल याचा मी विचार करत नाही, पात्राचा विचार करतो. हाच दृष्टिकोन ठेवत मी 'खाकी' आणि 'दीवानगी'मध्ये नकारात्मक भूमिका केल्या.

बातम्या आणखी आहेत...