आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उद्यापासून सिन्नरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी यंदा नाशिककरांना प्रथमच मिळणार असून, सिन्नरमध्ये अाडवा फाटा मैदानावर उभारण्यात अालेल्या क्रीडानगरीत बुधवारी सायंकाळी शुभारंभ हाेणार अाहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असाेसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असाेसिएशन, नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवस कबड्डी महाेत्सव रंगणार अाहे. स्पर्धेतील मुले व मुलींचे विजेते संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र हाेणार असल्याने त्यातील थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती माेठ्या प्रमाणात राहणार अाहे. पुरुषांचे २९ तर मुलींचे २५ संघ स्पर्धेत उतरणार अाहे. ६०० खेळाडू, ६० प्रशिक्षक, २०० पंच, स्वयंसेवक अशा सुमारे हजार जणांची निवास व भाेजनव्यवस्था करण्यात अाली अाहे.

 

सिन्नरमधील मान्यवर बांधकाम व्यावसायिकांकडून निवास व्यवस्थेची साेय करून देण्यात अाली अाहे. मुलींच्या रहिवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार अाहे. राेज दुपारी ४ वाजेपासून स्पर्धा रंगतील. एकूण ९२ सामने खेळविले जाणार अाहेत. अांतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळणाऱ्या कबड्डीपटूंचे काैशल्य बघण्यास मिळणार अाहे. अाठ हजार प्रेक्षक बसू शकतील एवढ्या क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात अाली अाहे. 


बुधवारी सायंकाळी उद‌्घाटन समारंभ हाेणार असून खेळाडूंचे संचलन, मानवंदना, सांस्कृतिक कार्यक्रम व सामूहिक नृत्याचे सादरीकरण केले जाणार अाहे. भाऊ कदम व बद्रिके यांच्या विनाेदाची अातषबाजी हाेणार अाहे. गुरुवारी रात्री ९ वाजता 'हवा येऊ द्या, फेम प्रसिद्ध विनाेदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके व सहकलाकारांचा धमाल विनाेदी कार्यक्रम पाहण्यास मिळणार अाहे. शुक्रवारी झी युवा वाहिनीवरील कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार अाहेत. शनिवारी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम हाेतील. रविवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने रंगतील. रंगारंग समारंभात पारिताेषिक वितरण करण्यात येणार अाहे. 


साडेतीन एकरच्या क्रीडानगरीत चार प्रवेशद्वार उभारण्यात अाली अाहे. सिन्नर बसस्थानकावरील पाेलिस चाैकीत खेळाडूंसाठी स्वागत कक्ष उभारण्यात अाला अाहे. क्रीडानगरीत वाहनतळ, अापत्कालीन व्यवस्थापन, अाैषधाेपचार केंद्राची उभारणी करण्यात अाली अाहे. 
अासनव्यवस्थेच्या मधाेमध मातीची सहा मैदानेे अासनव्यवस्थेच्या मधाेमध मातीची सहा मैदाने उभारण्यात अाली अाहे. त्यात ९२ सामने हाेतील. सामने जवळून पाहता येण्यासाठी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात अाली अाहे. राज्य कबड्डी असाेसिएशन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अामदार जयवंत जाधव, प्रकाश बाेऱ्हाडे, माेहन गायकवाड, प्रशांत भाबड यांच्यासह सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, क्रीडाशिक्षक परिश्रम घेत अाहेत. 


३.५ एकरवर क्रीडानगरी 
६ मैदाने 
९२ सामने 
२९ पुरुषांचे संघ 
६०० 
खेळाडू 
२५ मुलींचे संघ 
२०० पंच 
६० प्रशिक्षक

बातम्या आणखी आहेत...