आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरची कन्या ऑस्ट्रेलियात परिषदेत मांडणार मंगळ उपग्रहविषयक अभ्यास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनेगाव- देवयानी गुजर हिची ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या १८ व्या अंतराळ संशोधन परिषदेसाठी निवड  झाली आहे. भारतातून दोन मुलींची निवड झाली असून त्यात सिन्नरच्या देवयानीचा समावेश आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंटरनॅशनल एरोस्पेस सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया,  नॅशनल कमिटी फाॅर स्पेस अँड रेडिओ सायन्स,  मार्स सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया यांंच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन परिषद होत आहे. २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत गोल्डकोस्ट क्वीन्सलँड येथे ही परिषद होणार आहे. 

   
२४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत गोल्डकोस्ट क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया येथे १८ वी ऑस्ट्रेलियन स्पेस रिसर्च कॉन्फरन्स होत आहे. या कॉन्फरन्ससाठी भारतातून दोन मुलींची निवड झालेली आहे. त्यामध्ये मूळची सिन्नरची असणारी  (जि.नाशिक) देवयानी गुजर ही भारताचे प्रतिनिधित्व ऑस्ट्रेलियात करणार आहे. जगभरातून अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारे नामवंत संशोधक त्यात सहभागी होणार आहेत.    


मंगळयानासंदर्भात अभ्यास मांडणार  
मंगळावर जाणाऱ्या उपग्रहासाठी लागणारे इंधन, पाणी अवकाशातून कसे निर्माण करता येईल, त्यामुळे उपग्रहासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत, उपग्रहाचे आकारमान,  वजन कमी होऊन खर्च कमी होईल,  अवकाशातले प्रदूषण रोखले जाईल, असे महत्त्वाचे संशोधन ती जागतिक स्तरावर मांडणार आहे.  आयआयटी चेन्नईमधील प्रकल्प अधिकारी विक्रम रामानन यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. देवयानीने सिन्नरच्या लोकनेते वाजे विद्यालयातून दहावी, गुजर सिन्नर महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केली आहे. चेन्नईतील आयआयटीत अवकाश संशोधनात ती काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...