आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएचसीमधून रेफर होऊन आलेल्या महिलेचा मुलगा डिलीव्हरीच्या वेळेस झाला बेपत्ता, डॉ.म्हणाले-येथे कोणतीच डिलीव्हरी झालेली नाहीये...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसा- सिरसामध्ये एक विचीत्र घटना समोर आली आहे. येथे कम्यूनिटी हेल्थ सेंटर(सीएचसी) मधून सिव्हील हॉस्पीटलला रेफर होऊन आलेल्या एका 7 महीन्याचा गरोदर महिलेच्या डिलीव्हरीदरम्यान तिचे बाळ बेपत्ता झाले आहे. पण हॉस्पीटल प्रशासनाने येथे कोणतीच डिलीव्हरी झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी महिलेला अल्ट्रासाउंडसाठी पाठवले तर, तिच्या पोटात बाळ नसल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेच्या कुटुबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर हॉस्पीटलने कमिटी बनवून तपास सुरू केला आहे.

 

महिलेला ब्लीडिंग झाली म्हणून सीएचसीमधून केले होते रेफर
सिरसाच्या मंगाला गावच्या सुरेंद्र कुमारची पत्नी सीमा 7 महीन्यांची गरोदर होती. शनिवारी तिला ब्लीडिंग सुरू झाली, त्यानंतर ती माघो सिंघाना गावच्या सीएचसीमध्ये गेली. तिथे तिला सिरसा सिव्हील हॉस्पीटलला रेफर केले. ती अँबुलंसने सिव्हील हॉस्पीटलला गेली. येथे तिला डॉक्टरांनी संध्याकाळपर्यंत वाट पाहायला लावली. संध्याकाळी स्टाफ नर्स सीमाला डिलीव्हरी रूममध्ये घेऊन गेली.
 


काही वेळानंतर ती बाहेर आली म्हणाली अल्ट्रासाउंड कराव लागेल. महिला एका खासगी सेंटरवर अल्ट्रासाउंड करून आल्यावर कळाले की, पोटात मुलगाच नाहीये. त्यानंतर सीमाच्या घरच्यांनी हॉस्पीटल प्रशासनावर बाळ चोरी केल्याचा आरोप लावून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
 

तर हॉस्पीटल स्टाफचे म्हणने आहे की, येथे कोणतीच डिलीव्हरी झालेली नाहीये. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे की, महिलेचे बाळ गेले कुठे. महिलेने स्टाफवर निट काळजी न घेण्याचा आरोपदेखील लावला आहे आणि त्यासोबतच महिला म्हणाली की, आतमध्ये गेल्यावर तिला काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला होता, पण नर्सने तिला काहीच सांगितले नाही. महिलेच्या पहिल्या अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये 22 महिन्यांचे बाळ अशल्याचे समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...